तालिबानने 3 जर्मन पत्रकारांच्या घराची घेतली झडती, एकाच्या नातेवाईकाला घातल्या गोळ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

काबूल । अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर तालिबान मीडिया पर्सन आणि पत्रकारांना लक्ष्य करत आहे. रॉयटर्सच्या बातमीनुसार, तालिबान्यांनी काबुलमध्ये काम करणाऱ्या जर्मन वृत्तवाहिनी ड्यूश वेलेच्या पत्रकाराच्या नातेवाईकाची हत्या केली आहे. रिपोर्ट नुसार, तालिबानी एका अफगाण पत्रकाराच्या शोधात घरात घुसले होते. या दरम्यान त्याच्या नातेवाईकाला गोळी लागली आणि दुसरा जखमी झाला. पत्रकाराचे बाकीचे कुटुंब गेल्या महिन्यात काबूलमधून कसे तरी पळून गेले होते.

डॉईश वेले (DW) चे महासंचालक पीटर लिम्बर्ग म्हणतात की,” तालिबानची क्रूरता हे दर्शवते की, अफगाणिस्तानमध्ये आमचे कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय किती धोक्यात आहेत. यावरून हे स्पष्ट झाले आहे की, तालिबान आधीच काबूल आणि इतर शहरांमध्ये पत्रकारांची शिकार करत आहे आणि त्यांना लक्ष्य करत आहे. पीटर लिम्बर्गने या हत्येचा तीव्र निषेध केला आणि जर्मन सरकारला कारवाई करण्याचे आवाहन केले.

पीटर लिम्बर्ग यांनी एक निवेदन जारी करत म्हंटले कि,”आमच्या एका संपादकाच्या कुटुंबाची तालिबानने हत्या केली आहे. हे आमचे कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय अफगाणिस्तानात असलेल्या गंभीर धोक्याला दर्शवतात. यावरून हे स्पष्ट होते आहे की, तालिबान पद्धतशीरपणे काबूल आणि इतर प्रांतांमध्ये पत्रकारांचा शोध घेत आहेत. आता जास्त वेळ नाही. ”

रॉयटर्सच्या एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, तालिबानने डॉईश वेलेच्या किमान तीन पत्रकारांच्या घरांची झडती घेतली होती. त्याचवेळी, स्थानिक खाजगी चॅनेल गर्गाष्ट टीव्हीचे प्रमुख नेमतुल्लाह हेमत यांचे अपहरण करण्यात आले आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पख्तिया घाग या खासगी रेडिओ स्टेशनचे प्रमुख तुफान ओमर यांनाही तालिबानने गोळ्या घातल्या.

याआधी, अमदादुल्लाह हमदर्द, एक अफगाण अनुवादक, यालाही 12 ऑगस्ट रोजी जलालाबादमध्ये तालिबानने गोळ्या घातल्या होत्या. जर्मन वृत्तपत्र Dittsite साठी हमदर्द नियमितपणे लिहित असे. गेल्या महिन्यात, पुलित्झर पारितोषिक मिळवणारे भारताचे सुप्रसिद्ध फोटो-पत्रकार दानिश सिद्दीकी यांची देखील कंदहार येथे हत्या करण्यात आली होती.

Leave a Comment