काबूल । आता अफगाणिस्तानात तालिबानचे राज्य आले आहे. तेव्हापासून, प्रत्येक दिवस अनेक समुदायांसाठी चिंता आणि आव्हानांपैकी एक बनला आहे. महिला भयभीत झाल्या आहेत. LGBTQ समुदायाचे लोकही भयभीत झाले आहेत. या कम्युनिटी मधून येणाऱ्या बहुतेक लोकांचा असा विश्वास आहे की, जर तालिबानला त्यांच्या लैंगिकतेबद्दल माहिती मिळाली तर ते टिकणार नाहीत.
अनेक तालिबानी न्यायाधीशांनी खुलासा केला आहे की, आता त्यांच्या राजवटीत इस्लामिक शरिया कायदा लागू होईल. समलैंगिकांना भयानक मृत्यू दिला जाईल. तालिबानच्या न्यायाधीशांनी सांगितले की,” अंगावर भिंत पाडून समलैंगिकांची हत्या केली जाईल. तालिबानच्या न्यायाधीशाने शिक्षेबाबत असे खुलासे केले आहेत की, ते ऐकून हृदय हेलावून जाईल.
न्यायाधीश गुल रहीम यांनी जर्मन वृत्तपत्र बिल्डशी केलेल्या संभाषणात सांगितले की,”चोरीची शिक्षा म्हणून गुन्हेगारांचे हात -पाय कापले जातील. जर समलिंगी संबंध कायम ठेवले तर दोघांचेही प्रायव्हेट पार्ट सर्वांसमोर कापले जातील.”
स्काय न्यूजच्या एका रिपोर्टमध्ये एक अफगाण तरुण म्हणाला,”मी किशोर वयात असतानाच मला समजले की, मी समलिंगी आहे. मला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले. माझ्या जवळच्या मित्रांनी मला मारण्याचा प्रयत्न केला आहे. एकदा तर माझ्या वडिलांनीच मला ठार मारण्याचा प्रयत्न केला कारण मला माझ्या एका मित्राबरोबर पाहून मी समलैंगिक असल्याचा त्यांना संशय आला.”
ते पुढे म्हणाले की,” माझ्या जीवाला धोका आहे. म्हणून मी एका स्त्रीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. माझ्या आयुष्यातील हा सर्वात कठीण निर्णय आहे. आजही मी माझ्या भावनांशी लढत राहतो. कधीकधी मी रडतो आणि स्वतःला समजवण्याचा प्रयत्न करतो. पण जर मला जिवंत राहायचे असेल तर मला असेच गुदमरून राहावे लागेल.”
या व्यक्तीने सांगितले की,” जर एखादी व्यक्ती LGBTQ समुदायाची आहे हे तालिबानला कळले तर त्याला फाशीची शिक्षा द्यावी लागेल. मी सर्व शेजारील देशांमध्ये निर्वासित होण्यासाठी अर्ज केला आहे. कोणताही देश अफगाणिस्तानच्या लोकांना व्हिसा देत नाही. मात्र भारताने फ्री व्हिसा देण्याची घोषणा केली होती.”
आणखी एका समलिंगी व्यक्तीने पिंक न्यूजला सांगितले की,”तालिबान आम्हाला 1400 वर्षे मागे घेऊ इच्छित आहे. आपण त्यांच्याशी वाद घालू शकत नाही. त्यांना मोहम्मद सौदी अरेबियाच्या वाळवंटात राहत असताना 1400 वर्षांपूर्वीच्या काळात राहायचे आहे. नास्तिक आणि LGBQT लोकांना तालिबान राजवटीत कोणतेही स्थान नाही.”