तालिबानची धमकी – “आता जर कोणी सरकार स्थापनेत अडथळा आणला तर ते त्याला पंजशीरप्रमाणेच सामोरे जातील”

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

काबुल । तालिबानने अफगाणिस्तानात सरकार स्थापन करण्याची तयारी केली आहे. दरम्यान, पंजशीरही ताब्यात घेण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. यासोबतच तालिबानने आपल्या विरोधकांना कठोर इशारा दिला आहे. तालिबानने म्हटले -” जर नवीन सरकार स्थापन करण्यात कोणी अडचण निर्माण केली तर ते त्याला पंजशीरप्रमाणे सामोरे जातील.”

तालिबानचे प्रवक्ते जबीउल्लाह मुजाहिद यांनी सोमवारी काबूलमध्ये पत्रकार परिषद घेतली. या दरम्यान ते म्हणाले की,” आता येथे युद्ध संपले आहे, अफगाणिस्तान शांततेच्या दिशेने वाटचाल केली आहे. जर आता कोणी शस्त्र हाती घेतले तर तो जनतेचा शत्रू होईल.”

तालिबानचे प्रवक्ते जबीउल्लाह मुजाहिद म्हणाले की,”लोकांना हे समजले पाहिजे की बाहेरून येणारी लोकं कधीही देशाला स्थैर्य देऊ शकणार नाहीत, त्यामुळे आपला देश सांभाळण्याची जबाबदारी आपली आहे. तालिबानने यापूर्वीच पंजशीरमध्ये चर्चेद्वारे तोडगा काढण्याचा प्रयत्न केला होता, पण जेव्हा चर्चा चांगली झाली नाही, तेव्हा आम्ही प्रत्युत्तर दिले.”

तत्पूर्वी, नॉदर्न अलायन्सने तालिबानने पंजाशिरवर ताबा मिळवल्याचा दावा फेटाळून लावला. बंडखोर संघटना नॅशनल रेझिस्टन्स फ्रंट (NRF) ने तालिबानचा दावा चुकीचा असल्याचे म्हटले आहे. NRF ने म्हटले आहे की, तालिबान्यांनी पंजशीरवर पकड मिळवली असल्याचे चुकीचे आहे. आमचे सैनिक पंजशीरच्या प्रत्येक कोपऱ्यात उपस्थित आहेत.

NRF ने असेही म्हटले आहे की, आमचे कमांडर अजूनही महत्त्वाच्या पदांवर तैनात आहेत. यासह, आमचे सैनिक पंजशीर खोऱ्यात वेगवेगळ्या ठिकाणी तैनात आहेत. लढा अजूनही सुरू आहे. NRF ने आशा व्यक्त केली आहे की,” अफगाणिस्तानची जनता ही लढाई सुरु ठेवेल”

Leave a Comment