हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई आणि पुणे हि दोन महत्वाची शहरे असल्यामुळे तिथे वाहतुकीच्या अनेक समस्या उभारतात. या समस्यांवर उपाय करण्यासाठी सरकार विविध योजनांची आखणी करत असते. त्यामुळेच या दोन शहरांदरम्यान होणारा प्रवास अधिक सोयीस्कर आणि वेगवान करण्यासाठी मिसिंग लिंक केबल ब्रिज प्रकल्प अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. या प्रकल्पामुळे प्रवासातील अंतर तब्बल सहा किलोमीटरने कमी होणार आहे. तसेच खोपोली ते कूसगाव यादरम्यानच्या 13.3 किमी अंतरावर उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पामुळे वाहतूक कोंडी कमी होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना याचा मोठा फायदा होईल. तर चला या प्रकल्पाबदल अधिक माहिती जाणून घेऊयात.
मुंबई ते पुणे प्रवास –
सध्या मुंबई-पुणे प्रवास करताना खोपोली घाटात वाहतूक कोंडी, अपघात, आणि पावसाळ्यात होणाऱ्या भूस्खलनामुळे अनेक समस्या निर्माण होतात . या समस्या सोडवण्यासाठी या प्रकल्पांतर्गत दोन बोगदे आणि दोन केबल ब्रिज उभारले जात आहेत. यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे. तसेच हा प्रकल्प देशातील सर्वात उंच केबल ब्रिजचा मान पटकावणार असून याची उंची 183 मीटर आहे. दोन डोंगरांदरम्यान बांधला जाणारा हा ब्रिज 250 किमी/ताशी वाऱ्याचा वेग सहन करण्यासाठी क्षमता आहे. तसेच येथे वाहने येथे 100 किमी/ताशी वेगाने प्रवास करू शकतील.
मुंबईहून पुणे वेळ 25 मिनिटांनी कमी होणार –
सध्याच्या मार्गापेक्षा हा नवीन रस्ता 6 किमीने कमी असून मुंबईहून पुण्याला पोहोचण्याचा वेळ सुमारे 25 मिनिटांनी कमी होणार आहे. खोपोली एक्झिटपासून सिंहगड इन्स्टिट्यूटदरम्यानचे अंतर 19 किमीवरून 13.3 किमीवर येणार आहे. त्याचसोबत या प्रकल्पात 11 किमीचे बोगदे आणि 2 किमीचे केबल ब्रिज असणार आहेत. दोन्ही बोगद्यांचे खोदकाम पूर्ण झाले असून फिनिशिंगचे काम सुरू आहे. 850 मीटर लांब आणि 26 मीटर रुंद अशा दोन केबल ब्रिजपैकी पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून दुसऱ्या टप्प्याचे काम प्रगतीपथावर सुरु आहे.
प्रवाशांसाठी महत्त्वाचा टप्पा –
मुंबई ते पुण्यावरील प्रवाशांसाठी हा प्रकल्प महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. या प्रकल्पामुळे प्रवास अधिक सुरक्षित आणि जलद होण्यासोबतच वाहतूक कोंडी आणि अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर कमी होईल,