तांबवे ग्रामपंचायतीने जिल्हा परिषद शाळेत बसविले ‘प्लेव्हर ब्लाॅक’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी| विशाल वामनराव पाटील
ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमध्ये गुणवत्ता वाढ चांगली झाली आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून अनेक विद्यार्थी आज जिल्हा परिषद शाळांमध्ये दाखल झाले आहेत, असे प्रतिपादन केंद्र प्रमुख निवास पवार यांनी केले.

तांबवे जि. प. प्राथमिक केंद्र शाळा, तांबवे ग्रामपंचायतीचे वतीने 15 व्या वित्त आयोग निधीतून बसवण्यात आलेल्या प्लेव्हर ब्लाॅकचे व वर्ग सुशोभिकरण उद्घाटन वेळी ते बोलत होते. वडगाव हवेलीच्या प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक दिपक पवार, पत्रकार हेमंत पवार, सरपंच शोभाताई शिंदे, उपसरपंच ॲड. विजयसिंह पाटील, स्वा. सै. आण्णा बाळा पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. व्ही. पोळ, पत्रकार विशाल पाटील, प्रदिप राऊत, धीरज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

एस. व्ही. पोळ म्हणाले, ग्रामीण भागातील शाळांचा तसेच विद्यार्थ्याचा शिक्षणाचा दर्जा सुधारत आहे. आजच्या स्पर्धेत विद्यार्थी टिकण्यासाठी शिक्षणांच्या सोयी- सुविधाही उपलब्ध असणे गरजेचे आहे. तांबवे जिल्हा परिषद शाळा स्मार्ट शाळेकडे वाटचाल करीत आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत मुख्याध्यापक अशोक देसाई यांनी केले. सुत्रसंचलन प्रेरणा मोरे यांनी केले.