तामिळनाडूमध्ये मंदिर उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; विजेचा धक्क्याने 10 जणांचा मृत्यू, 15 जखमी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तामिळनाडूमधील तंजावर येथे बुधवारी रात्री एक मोठी दुर्घटना घडली असून एका मंदिरात मिरवणुकीदरम्यान विजेचा धक्का लागून 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 15 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. जखमींवर तंजोर मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, तामिळनाडूतील तंजावर जिल्ह्यात एका मंदिरात मिरवणुकीवेळी त्या ठिकाणी असलेल्या विजेच्या तारेला रथाचा स्पर्श झाला. त्यामुळे संपूर्ण रथात करंट पसरला त्यातून पुढे आग पसरली.

मंदिरातील रथ यात्रेदरम्यान मोठ्या संख्येने भाविक जमले होते. रथ यात्रा सुरू असतानाच रथाचा स्पर्श विजेच्या तारांना झाला. या दुर्घटनेत अनेक लोक जखमी झाले. यानंतर उच्च अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मदत आणि बचाव कार्य केले.