केरळच्या प्रश्नाला तामिळनाडूचे दिले उत्तर; नारायण राणे पुन्हा गडबडले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी लोकसभेत केलेल्या एका भाषणाची सध्या जोरदार चर्चा होऊ लागली आहे. ती म्हणजे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केरळच्या खासदाराला चक्क तामिळनाडूचे उत्तर दिले. शेवटी सभापतींनी त्यांच्या चूक लक्षात आणून दिल्यानंतर राणेंना समजले. मात्र, याचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.

लोकसभेत नुकतेच केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना केरळचे खासदार सुरेश कोडीकुन्नील यांनी एक प्रश्न विचारला त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना राणेंची मात्र, फसगत झाली. यावेळी कोडीकुन्नील यांनी कोरोना काळात उद्योगांचे प्रचंड नुकसान झाले. या काळात सरकारने काय मदत केली. याचे सविस्तर उत्तर देण्याचे आवाहन मंत्री राणेंना केले. त्यावर मंत्री राणे यांनी “कोरोनाच्या महामारीचा गेल्या दोन वर्षांत उद्योग क्षेत्रावर गंभीर परिणाम झाला.

त्यामुळे अनेक उद्योग बंद पडले. काही सुरूही झाले. मात्र, आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी प्रधानमंत्री रोजगार सृजन कार्यक्रमांतर्गत अनेक योजना सुरू केल्या आहेत. उद्योगांसाठी वेगवेगळ्या योजना सुरू केल्या. त्यातून आम्हाला तामिळनाडू मध्येही अनेक उद्योगकांना त्यांचे उद्योग सुरू करण्यासाठी मदत झाली आहे. त्यांना कर्ज दिले, असे म्हंटले.

मंत्री राणे यांनी एका प्रश्नाला दुसऱ्याच प्रश्नाचे उत्तर दिले आहे. सुरेश कोडीकुन्नील हे केरळचे आहेत. आणि त्यांच्या प्रश्नाला तामिळनाडूतील कामाचे कारण सांगत उत्तर दिले आहे. त्यामुळे तुम्ही तामिळनाडू समजून घ्या, असा सल्ला सभापतींनी राणेंना दिला. त्यानंतर राणेंच्या लक्षात त्यांनी केलेली चूक आली.

Leave a Comment