चेन्नई । दाक्षिणात्य मनोरंजन विश्वातील प्रख्यात अभिनेत्री चित्रा कामराज (VJ Chitra Kamraj) हिने आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. चित्राने चेन्नईतील हॉटेलमध्ये गळफास घेऊन आयुष्य संपवलं. वयाच्या अवघ्या 28 व्या वर्षी तिने घेतलेल्या टोकाच्या निर्णयामुळे चाहते हादरले आहेत. (Tamil TV serial actress and anchor chithra committed suicide)
चेन्नईतील नसरप्रीत भागात असलेल्या हॉटेलमध्ये चित्रा थांबली होती. या हॉटेलमध्येच तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. चेन्नईतील प्रसिद्ध उद्योगपतीसोबत नुकताच तिचा साखरपुडा झाला होता. विजय टीव्हीवर सुरु असलेल्या पॅनडियन स्टोअर्स (Pandian Stores) या मालिकेतील तिची मुख्य व्यक्तिरेखा चांगलीच गाजत होती. चित्राने साकारलेली मुल्लई ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. त्यातच चित्राने आत्महत्येसारखा निर्णय घेतल्यामुळे तिचे कुटुंबीय, सहकलाकार आणि फॅन्सही धक्क्यात आहेत.
नैराश्यातून आत्महत्येची चर्चा
चित्राला नैराश्याने ग्रासले असल्याचे बोलले जाते. त्यातूनच तिने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र तिच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. धक्कादायक म्हणजे आत्महत्येच्या काही तास आधी तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट आणि स्टोरीही शेअर केले होते. त्यानंतर तिने आत्महत्येचा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
अँकर म्हणून यशस्वी कारकीर्द
चित्राने 2013 मध्ये वयाच्या 21 व्या वर्षी अँकर म्हणून कारकीर्द सुरु केली. व्हीजे चित्रा म्हणून तिने मनोरंजन विश्वात नाव कमावलं. सुरुवातीला तिने अनेक तामिळ टीव्ही कार्यक्रमांचं सूत्रसंचालन केलं होतं. मन्नन मंगल मालिकेतून चित्राने मालिका विश्वात पाऊल ठेवलं, तिने केलेल्या मोजक्या मालिकांपैकी वेलुनाची मालिकेतील तिची मुख्य भूमिका गाजली होती. याशिवाय चिन्ना पापा पेरिया पापा, डार्लिंग डार्लिंग अशा काही मालिकाही तिने केल्या.
चित्रा उत्तम नृत्यांगनाही होती. ती काही डान्स रिअॅलिटी शोमध्येही सहभागी झाली होती. जोडी अनलिमिटेड या शोमध्ये ती उपविजेतेपद पटकावलं होतं.
https://www.instagram.com/p/CIW91T4nhIb/?utm_source=ig_web_copy_link
बड़े दिलवाला! सोनू सूदने गरजूंच्या मदतीसाठी स्वतःची दुकाने, फ्लॅट गहाण ठेवून घेतलं 10 कोटींचं कर्ज
वाचा सविस्तर- https://t.co/ymZXgJEDjt@SonuSood #sonusood #HelloMaharashtra #Bollywood— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) December 9, 2020
या' मोबाईल अॅपद्वारे करता येईल कोरोना लशीची नोंदणी; आरोग्य मंत्रालयाची माहिती
वाचा सविस्तर-👉🏽 https://t.co/GTPAxM7zBg#CoronaVaccine #coronavirus #HelloMaharashtra #Corona— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) December 9, 2020
फक्त 'या' कारणामुळं हॉटेल ताज पॅलेसची तब्बल 8 कोटी 85 लाखांची थकबाकी BMCने केली माफ
वाचा सविस्तर-👉🏽 https://t.co/FyhrfByhDc#tajhotel #Mumbai #HelloMaharashtra #BMC— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) December 9, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’