Tamim Iqbal Heart Attack : क्रिकेटपटू तमिम इक्बालला हृदयविकाराचा झटका; प्रकृती गंभीर

Tamim Iqbal Heart Attack
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बांगलादेश क्रिकेट संघाचा माजी खेळाडू तमिम इक्बालला हृदयविकाराचा झटका (Tamim Iqbal Heart Attack) आलाय…. ढाका प्रीमियर डिव्हिजन क्रिकेट लीग सामन्यादरम्यान तमिमला हर्ट अटॅक आला… फिल्डिंग करत असताना अचानकपणे तमिमच्या छातीत दुखू लागलं.. ईएसपीएनक्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, मोहम्मद स्पोर्टिंग क्लब आणि शाईनपुकुर क्रिकेट क्लब यांच्यातील ५० षटकांच्या सामन्याच्या पहिल्या डावात ही घटना घडली. सध्या तमिम इक्बालला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असलं तरी त्याची प्रकृती गंभीर असल्याचं बोललं जातंय…

तमिमची प्रकृती चिंताजनक – Tamim Iqbal Heart Attack

हर्ट अटॅक आल्यानंतर (Tamim Iqbal Heart Attack) तमीमला रुग्णालयात नेण्यासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यात आली होती, परंतु सावरमधील बीकेएसपी मैदानावर हेलिकॉप्टर लँडिंगची सुविधा नव्हती आणि तेथून त्याला विमानाने हलवता आले नाही.” नंतर त्याला फजिलातुन्नेस रुग्णालयात नेण्यात आले. तमिमची प्रकृती अत्यंत गंभीर असून त्याला लाईफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवण्यात आलं आहे. तसेच त्याला ढाका येथे हलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, परंतु त्याची प्रकृती बघता त्याला लगेच शिफ्ट करणं धोकादायक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

बांगलादेश क्रिकेट संघाचे अधिकारी तारिकुल इस्लाम यांनी सांगितले की , ढाक्याच्या बाहेरील सावर येथील रुग्णालयात तमीमवर उपचार सुरू असून तो लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी देशवासीय प्रार्थना करत आहेत. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने त्यांची नियोजित बोर्ड बैठक रद्द केली असून बोर्डाचे अनेक सदस्य तमीम इक्बालला रुग्णालयात (Tamim Iqbal Heart Attack) भेटण्यासाठी गेलेत

तमिम इक्बाल हा बांग्लादेशच्या दिग्गज खेळाडूंमध्ये गणला जातो…. डाव्या हाताने फलंदाजी करणारा तमिम हा बांग्लादेशकडून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे, म्हणूनच त्याला बांगलादेशचा सचिन म्हणूनही संबोधलं जात. तमिम इक्बालने बांगलादेशसाठी ७० कसोटी सामन्यांमध्ये ३८.८९ च्या सरासरीने ५१३४ धावा केल्या, ज्यामध्ये १० शतके आणि ३१ अर्धशतकांचा समावेश होता. तमिमने २४३ एकदिवसीय सामन्यांमध्ये ३६.६५ च्या सरासरीने ८३५७ धावा केल्या आहेत. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याने १४ शतके आणि ५६ अर्धशतके झळकावली आहेत. याशिवाय तमिमने ७८ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये २४.०८ च्या सरासरीने १७५८ धावा केल्या. तमिमच्या नावावर टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एक शतक आणि सात अर्धशतके आहेत.