Tan Removal Home Remedies : उन्हामुळे त्वचा टॅन झालीये? चिंता सोडा!! ‘या’ उपायांनी घरच्याघरी दूर होईल काळपटपणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Tan Removal Home Remedies) उन्हात घराबाहेर पडायचं म्हटलं की, जीवावर येतं. एकतर कडक उन्हाचे चटके सहन करावे लागतात आणि दुसरं म्हणजे टॅनिंगची समस्या होते. उन्हात बाहेर पडताना सनस्क्रीन लावणे, चेहरा आणि हात पाय पूर्ण झाकतील याची काळजी घेणे फार गरजेचे असते. पण बरेच लोक याकडे दुर्लक्ष करतात आणि यामुळे बराच वेळ उन्हात राहिल्याने त्यांची त्वचा काळपट पडते. ज्याला टॅनिंग म्हणतात.

हे टॅनिंग इतकं हट्टी असतं की, काही केल्या जात नाही. बराच काळ हा काळपटपणा तसाच राहतो आणि परिणामी शरीराच्या इतर भागापेक्षा टॅनिंग झालेली त्वचा वेगळी दिसू लागते. जे फार विचित्र दिसतं. (Tan Removal Home Remedies) तुम्हीही टॅनिंगच्या समस्येने त्रस्त असाल तर ही बातमी पूर्ण वाचा. कारण आज आम्ही तुम्हाला घरच्याघरी टॅनिंग काढून टाकतील असे काही उपाय सांगणार आहोत. ज्यामुळे तुमच्या त्वचेवरील काळपटपणा दूर होईल. चला जाणून घेऊया.

1. कच्चे दूध ((Tan Removal Home Remedies))

टॅनिंगवर सगळ्यात प्रभावी उपाय म्हणजे कच्चे दूध. यातील लॅक्टिक ॲसिड त्वचेवरील काळपटपणा दूर करण्यासाठी ब्लीचिंग एजंट म्हणून काम करते. यासाठी कच्चे दूध घ्या आणि टॅन झालेल्या भागावर हलक्या हाताने चोळा. साधारण अर्ध्या तासाने तो भाग स्वच्छ धुवा. असे आठवडाभर करा. कच्चे दूध हे आपल्या त्वचेला एक्सफोलिएट करते आणि यामुळे मृत त्वचेच्या पेशी निघून जातात. परिणामी त्वचा आधीसारखी तेजस्वी आणि मुलायम होते.

2. बटाट्याचा रस

टॅनिंग दूर करण्यासाठी बटाट्याचा रस देखील फायदेशीर ठरतो. कारण, यामध्ये कॅटेकोलेज नावाचे एन्झाइम असते. ज्याच्या वापराने त्वचेचा रंग सुधारतो आणि काळे डाग निघून जातात. यासाठी बटाट्याचा रस काढण्याऐवजी थेट बटाट्याचे कापदेखील वापरता येतील. टॅनिंग झालेल्या त्वचेवर बटाट्याचा रस किंवा काप चोळा आणि थोड्या वेळाने तो भाग स्वच्छ धुवा. यानंतर लगेच तुम्हाला फरक दिसेल.

3. ताज्या कोरफडीचा गर

त्वचेवरील टॅनिंग दूर करण्यासाठी ताज्या कोरफडीचा गर वापरा. (Tan Removal Home Remedies) टॅन झालेल्या त्वचेवर कोरफडीचा गर लावा आणि अर्ध्या तासाने तो भाग धुवा. यामुळे टॅनिंग खूप कमी होईल. आठवड्याभरात याचा परिणाम दिसून येईल.

4. काकडी

टॅनिंगवर काकडीचे काप किंवा रस फायदेशीर मानला जातो. कारण यामध्ये जळजळ आणि खाज कमी करणारी तत्त्व असतात. शिवाय काकडीतील थंडपणा त्वचेला ओलावा प्रदान करतो. (Tan Removal Home Remedies) यामुळे टॅनिंग झाली तर काकडी हा एक प्रभावी उपाय ठरतो.

5. दही

टॅनिंग दूर करण्यासाठी दह्याचा चांगला वापर करता येतो. यासाठी १ वाटी दह्यात चिमूटभर हळद घालून तयार पेस्ट टॅनिंगवर लावा. अर्ध्या तासाने तो भाग स्वच्छ पाण्याने धुवा. (Tan Removal Home Remedies) यामुळे त्वचेवरील काळेपणा दूर होऊन तुमचा रंग उजळतो.

6. बेसन

सूर्यप्रकाशामुळे टॅन झालेली त्वचा पुन्हा पूर्वीसारखी तेजस्वी करायची असेल तर बेसन एक उत्तम पर्याय आहे. कारण, बेसनमुळे त्वचेची टॅनिंग दूर होते. अगदी २ चमचे बेसन आणि त्यात गुलाबपाणी मिसळून तयार पेस्टने टॅन झालेला भाग स्क्रब करा. अर्ध्या तासाने पाण्याने स्वच्छ करा. काही मिनिटांतच तुम्हाला फरक दिसून येईल. (Tan Removal Home Remedies)