देशात शेतकरी आंदोलन सुरुये अन लोक माझ्या बिकनीवर बोलतायत व्वा! भिडे गुरुजींची सोनू संतापली

मुंबई । ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेतील जुनी सोनू अर्थात निधी भानुशाली सध्या चर्चेत आहे. कारण आहे नेटकऱ्यांना डोळ्यात खुपलेले तिचे बोल्ड फोटो. निधीने तिचे बिकनीतील बोल्ड फोटो शेअर केलेत. गोव्यात सुट्टीचा आनंद घेत असलेल्या निधीने स्विमसूटमधील हे फोटो शेअर केलेत आणि ते लगेच व्हायरल झालेत. इतकेच नाही तर या फोटोवर कमेंट्सचा पाऊस पडला. पण निधीला हे काही रूचले नाही. देशात शेतकरी आंदोलन सुरु असताना लोक आपल्या बिकिनी फोटोंवर चर्चा करतात, हे पाहून निधी जोरदार भडकली. एका मुलाखतीत तिने आपला हा संताप व्यक्त केला.

Sonu Bhide aka Nidhi Bhanushali #tmkoc in 2020 | Asian beauty girl, Indian  bollywood actress, Beautiful girl indian

 

टाइम्स आॅफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत निधी यावर बोलली. ‘देशात शेतकरी आंदोलन सुरू आहे आणि लोक माझ्या बिकिनी फोटोवर चर्चा करत आहेत, याचे मला आश्चर्य वाटतेय. सोबत रागही येतोय. गंभीर मुद्यांकडे लोक दुर्लक्ष करतात आणि लोकांच्या बिकिनी फोटोंवर कमेंट करण्यात तासन् तास घालवतात, हे पाहून मी हैराण आहे. निश्चितपणे हे माझे आयुष्य आहे आणि इतर लोकांप्रमाणे मीदेखील माझ्या आयुष्यातील काही क्षण सोशल मीडियावर शेअर केले. पण यानंतर मी ट्रेंड करू लागले, याचे मला आश्चर्य वाटते. लोक माझे बिकिनी फोटोज पाहत आहेत आणि त्यावर चर्चा करण्यात वेळ खर्च करत आहे. मी माझ्या मित्रमैत्रिणींशीदेखील याबाबत बोलले. तेव्हा त्यांनादेखील हे थोडे विचित्र आणि हास्यस्पद वाटले. मला तर राग येतोय,’ असे निधी म्हणाली.

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah's Nidhi Bhanushali aka former Sonu's  glamorous transformation | The Times of India

‘माझे तसे फोटो पाहून लोकांना म्हणे धक्का बसला. मात्र मला कुणालाही असा कुणालाही धक्का देण्याचा उद्देश नव्हता. मी कोणत्याही न्यूजला फॉलो करत नाही, त्यामुळे मला सोशल मीडियावर असे पोस्ट येत नाही. जेव्हा मला माझ्या नातेवाईकांनी, मित्रमैत्रिणींनी अशा बातम्यांची लिंक पाठवली तेव्हा मला लोकांना कळले. मला आश्चर्य वाटते की, देशातील गंभीर मुद्दे सोडून लोक माझ्या बिकिनी फोटोवर चर्चा करत आहेत,’असेही ती म्हणाली. ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मध्ये आत्माराम तुकाराम भिडे यांच्या मुलीची भूमिका निधीने साकारली होती. अनेक वर्षे ही भूमिका साकारल्यानंतर गेल्यावर्षी तिने ही भूमिका सोडली होती.

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah's Former Sonu Aka Nidhi Bhanushali Flaunts  Her Curves In Bikini, Check Her Latest PICS

 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like