Sunday, February 5, 2023

कोरोनाने हिरावले टप्पू के पप्पा; ‘तारक मेहता..’ फेम भव्य गांधीच्या वडिलांचे निधन

- Advertisement -

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। राज्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. कोरोनाची हि लाट आधीच्या लाटेतून अधिक भयावह रूप धारण करून अली आहे. आत्तापर्यंत कोरोनाच्या या लाटेने अनेकांचे बळी घेतले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ फेम भव्य गांधी याचे वडील विनोद गांधी यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. गेल्या दहा दिवसांपासून ते मुंबईतील कोकिलाबेन रूग्णालयात उपचारासाठी भरती होते. मात्र अखेर काल त्यांची प्राणज्योत मालवली.

https://www.instagram.com/p/BkHNdUilWO4/?utm_source=ig_web_copy_link

- Advertisement -

अभिनेता भव्य गांधीचे वडील विनोद गांधी हे कंस्ट्रक्शन बिझनेसमध्ये होते. दहा दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले होते. त्यांना तात्काळ उपचारासाठी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून ते व्हेंटिलेटर सपोर्टवर होते. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनंतर आणि योग्य औषधोपचार देऊनही मंगळवारी अचानक त्यांच्या शरीरातील आॅक्सिजनचे प्रमाण कमी होऊ लागले. याचदरम्यान त्यांचे निधन झाल्याची माहिती मिळत आहे. भव्य गांधी आपल्या वडिलांच्या खूपच जवळ होता. यामुळे त्यांच्या निधनाचा त्याला मोठा धक्का बसला आहे.

https://www.instagram.com/p/B53Mqw2ng30/?utm_source=ig_web_copy_link

 

भव्य सध्या टीव्हीपासून दूर गुजराती चित्रपटांमध्ये व्यस्त आहे. ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेतील प्रत्येक पात्रांवर रसिकांनी भरभरून पसंती दर्शवली. टप्पूची व्यक्तिरेखा साकारणारा भव्य प्रेक्षकांचा प्रचंड लाडका होता. खरंतर भव्यला याच मालिकेने लोकप्रियता मिळवून दिली होती. या मालिकेतील त्याचा अभिनय, त्याची केस उडवण्याची स्टाइल सगळे काही रसिकांना खूपच आवडायचे. ही मालिका सुरू झाल्यापासूनच तो या मालिकेचा तब्बल ९ वर्षे भाग होता. २०१७ साली त्याने हा शो सोडला होता. मात्र आजही ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’च्या स्टारकास्टसोबत भव्यचे ऋणानुबंध कायम आहेत. या मालिकेत दयाबेनची भूमिका साकारणा-या दिशा वकालीसोबत त्याचा खूप चांगला बॉन्ड आहे.