तरुण तेजपाल यांची निर्दोष मुक्तता, गोव्याच्या सेशन कोर्टाचा निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पणजी : वृत्तसंस्था – तहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांना गोव्यातील सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. त्यांच्यावर 2013 मध्ये गोव्यातील लक्झरी हॉटेलच्या लिफ्टमध्ये एका महिला सहकाऱ्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला होता. नोव्हेंबर 2013 मध्ये गोवा पोलिसांनी तेजपाल यांच्या विरोधात एफआयआर दाखल करून त्यांना अटक केली होती. मे 2014 त्यांना जामीन मंजूर झाला होता. तेव्हापासून ते जामिनावर होते. यानंतर देशात कोरोनाची परिस्थिती निर्माण झाली त्यानंतर या केसचा निकाल पुढे ढकलण्यात आला. अखेर आज 21 मे रोजी तरुण तेजपाल यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

या कलमांखाली चालू होता खटला
पत्रकार तरुण तेजपाल यांच्यावर भा.दं.वि. कलम 342 (चुकीच्या पद्धतीने रोखणे), 342 (वाईट हेतूने कैद करणे), 354 (प्रतिमा हनन करण्याच्या हेतूने हल्ला किंवा गुन्हेगारी बळाचा वापर करणे), 354-ए (लैंगिक छळ), 376 (2) (महिलेवर अधिकार पदावर असलेल्या व्यक्तीद्वारे बलात्कार) आणि 376 (2) (के) (नियंत्रणीय स्थितीत असलेल्या व्यक्तीद्वारे बलात्कार) च्या अंतर्गत खटला दाखल करण्यात आला होता.

काय आहे नेमके प्रकरण
गोवामध्ये तहलकाचा एक इव्हेंट होता. त्यावेळी तरुण तेजपाल यांची सहकारी महिला पत्रकार रात्री जेव्हा गेस्टला खोलीपर्यंत सोडून परतत होती तेव्हा तिला हॉटेलच्या ब्लॉक 7 च्या एका लिफ्टच्या समोर तिचा बॉस तरुण तेजपाल भेटले. तेजपाल यांनी गेस्टला पुन्हा जागे करण्याचे सांगून अचानक तिला त्याच लिफ्टमध्ये खेचले. यानंतर तेजपाल यांनी तिला काही कळायच्या आत लिफ्टची बटने अशा पद्धतीने दाबण्यास सुरूवात केली की ती थांबू नये आणि दरवाजा उघडू नये. असे त्या महिला पत्रकाराने आपल्या तक्रारीत म्हणले आहे.

Leave a Comment