तासगाव साखर कारखाना प्रतिटन २८५० रुपये दर देणार – खासदार संजयकाका पाटील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे

तासगाव पलूस सहकारी साखर कारखाना चालू गळीत हंगामात ऊसाला प्रतिटन २८५० रुपये प्रमाणे दर देणार असल्याची खासदार संजयकाका पाटील यांनी घोषणा केली आहे. तासगाव – पलूस तालुका सहकारी कारखान्याची मालमत्ता एस.जी.झेड अँड एस.जी. ए.शुगर्स या कंपनीकडे हस्तांतरित झाल्यानंतर २०२०-२०२१ या गळीत  हंगामात कारखाना सुरू करण्यात आला आहे.

यापुढे बोलताना खा.संजयकाका पाटील म्हणाले की,चालू गळीत हंगामात पाच लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. नऊ ते दहा वर्षे बंद होता.केंद्र व राज्य सरकारच्या मार्गदर्शक सुचने प्रमाणे साखर उतारा व तोडणी वाहतूक खर्च यांच्या आधारे एफ.आर.पी.निश्चित होऊ शकत नाही.लगतच्या सर्व कारखान्यांकडे सहवीज,आसवनी असे जादा उत्पन्न मिळवून देणारे उपपदार्थ निर्मिती प्रकल्प आहेत.

केवळ साखरेच्या उत्पादनाच्या आधारे ऊसउत्पादक शेतकऱ्यांना जादा दर द्यावा यासाठी तोटा सहन करून ही २८५० रुपये प्रतिटन दर देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचं त्यांनी सांगितलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment