… असा बनवा चटपटीत झटपट ‘मसाला पराठा’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

खाऊगल्ली । पराठा हा पदार्थ सर्वांनाच आवडतो. सहज सोप्या पद्धतीने आवडणारा पराठ्याचे अनेक प्रकार आहेत. आज आपण जाणुन घेणार आहोत चटपटीत मसाला पराठ बनवायची झटपट पद्धत.

साहित्य
एक चमचा धनेपूड , जिरे पूड , तेल किंवा बटर , कांदा मसाला किंवा गरम मसाला, चिरलेली कोथिंबीर , अर्धा चमचा मीठ , पाव चमचा पिठीसाखर, दोन-तीन चमचे तीळ, सहा पोळ्यांची कणीक .

कृती –
१) कणकेचा एक गोळा घेऊन पिठीवर फुलक्याएवढी पोळी लाटावी .
२) मग नेहमीप्रमाणे तेल किंव्हा बटर लावावं . तीळ सोडून इतर सर्व मसाले एकत्र कालवावे .
३) त्यापैकी एक चमचा मसाला लाटलेल्या फुलक्यावर पसरावा आणि मग त्याची गुंडाळी करून चकलीप्रमाणे घट्ट वळवावी जसे आपण लच्छा पराठा साठी करतो , त्यानंतर लाटी दाबावी व पिठी आणि तिळावर जाडसर लाटावी . तेल सोडून हा पराठा खरपूस भाजावा . सॉसबरोबर किंवा हिरव्या चटणी सोबत सर्व्ह करावा

अखेर मुख्यमंत्री शिवसेनेचाच! काँग्रेसच्या पाठिंब्याने बाळासाहेबांचे स्वप्न साकार

 

Leave a Comment