Tata Automatic CNG Car : Tata ने लाँच केल्या 2 ऑटोमॅटिक CNG कार; किंमत किती पहा

Tata Automatic CNG Car Launch
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Tata Automatic CNG Car : देशातील सर्वात मोठी ऑटोमोबाईल कंपनी असलेल्या टाटा मोटर्सने मोठा धमाका केला आहे. कंपनीने देशातील पहिली ऑटोमॅटिक CNG कार लाँच केली आहे. याअंतर्गत Tiago CNG AMT आणि Tigor CNG AMT ऑटोमॅटिक ट्रान्समिशन गिअरबॉक्ससह लॉन्च करण्यात आली आहे. टाटाच्या या दोन्ही गाड्यांची एक्स शोरूम किंमत 7.9 लाख रुपयांपासून सुरु होत आहे. आज आपण टाटाच्या या ऑटोमॅटिक CNG कारचे फीचर्स आणि रेंज याबाबत सविस्तर जाणून घेऊयात…

कंपनीने या दोन्ही कारच्या डिझाईन आणि इतर फीचर्स मध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. Tiago iCNG आणि Tigor iCNG मध्ये 1.2-लिटर 3-सिलेंडर पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन पेट्रोल मोडमध्ये 84 bhp पॉवर आणि 113 NM टॉर्क जनरेट करते. तर, सीएनजी मोडवर ते ७२ बीएचपी पॉवर आणि ९५ एनएम टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि 5-स्पीड ऑटोमॅटिक (AMT) गिअरबॉक्सला जोडलेले आहे. टाटा मोटर्सचा दावा आहे की दोन्ही कार ऑटोमॅटिक ट्रांसमिशनसह CNG मोडमध्ये 28.06 किमी/किलो मायलेज देतील.

टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्स लिमिटेडचे ​​मुख्य वाणिज्य अधिकारी अमित कामत म्हणाले, गेल्या काही वर्षात CNG गाडयांना मोठी चालना मिळाली आहे. त्यात आता मोटर्सने उद्योगात प्रथमच ट्विन-सिलेंडर तंत्रज्ञान, हाय-एंड फीचर ऑप्शन देत थेट सीएनजी स्टार्टिंग कार लाँच करून करून उद्योगात क्रांती आणली आहे. गेल्या 24 महिन्यांत आम्ही 1.3 लाखाहून अधिक CNG गाड्यांची विक्री केली आहे. आता आम्ही अजून पुढे जात ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह टियागो आणि टिगोर आयसीएनजी लाँच (Tata Automatic CNG Car ) करत आहोत.

किमती किती? Tata Automatic CNG Car

Tata Tiago ICNG ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह XTA व्हेरिएंटची किंमत 7,89,900 रुपये आहे. तर, XZA+ व्हेरिएंटची किंमत 8,79,900 रुपये ठेवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे XZA+ DT व्हेरियंटची किंमत रु 8,89,900 आणि XZA NRG मॉडेलची किंमत रु 8,79,900 आहे. दुसरीकडे, Tata Tigor ICNG ची किंमत ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असलेल्या XZA व्हेरियंटसाठी 8,84,900 रुपये आणि XZA+ व्हेरिएंटसाठी 9,54,900 रुपये आहे.