रतन टाटांच्या इन्स्टाग्राम पोस्टवर लाईक्सचा पाऊस; तरुणपणातील फोटोने घातला चांगलाच धुमाकूळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र । रतन टाटा हे सोशल मिडियाप्रेमी उद्योजक काही महिन्यांपूर्वीच इन्स्टाग्रामवर आले असून त्यांनी पोस्ट केलेल्या एका फोटोने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. रतन टाटा यांचा हा तरुणपणातील फोटो आहे. रतन टाटा यांच्या या फोटोला काही तासातच लाखो लाइक्स मिळाले असून कमेंट्सचा तर पाऊस पडत आहे. रतन टाटा यांचे इन्ट्राग्रामवर आठ लाख ३१ हजार फॉलोअर्स आहेत. गुजरातमधील सूरत येथे २८ डिसेंबर १९३७ रोजी जन्म झालेले रतन टाटा आज ८२ वर्षांचे आहेत.

 

रतन टाटा यांनी ऑक्टोबर महिन्यात इन्स्टाग्राम अकाऊंट सुरु केलं. आपण खरंतर बुधवारीच हा फोटो टाकणार होतो, पण जुने फोटो थ्रोबॅक म्हणून गुरुवारी टाकतात हे मला समजलं आणि म्हणून आपण हा फोटो गुरुवारी टाकल्याचं रतन टाटा म्हणाले. थ्रोबॅक थर्सडे असा हॅशटॅग रतन टाटांनी आपल्या फोटोला दिला असून या फोटोची जादू आणखी काही दिवस नेटकऱ्यांच्या मनात नक्कीच राहील याबाबत शंका नाही.

ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमच्या 8080944419 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा ”Hello News”

हे पण वाचा-

अर्थसंकल्प दरवर्षी का सादर करतात?

#Budget2020: म्युच्युअल फंडमधून पैसे कमविणाऱ्यांना ‘या’ करातून मिळू शकते सवलत

२६ जानेवारी रोजी नेहरुंनी सर्वांत पहिल्यांदा केली होती पुर्ण स्वराज्याची घोषणा

Leave a Comment