हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| म्युच्युअल फंड (Mutual Fund) हे दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी एक आकर्षक पर्याय मानले जातात. विशेषत म्हणजे, कर बचतीसाठी ईएलएसएस (Equity Linked Savings Scheme) योजना लोकप्रिय ठरतात. या मार्फतच टाटा ईएलएसएस टॅक्स सेव्हिंग फंडाने गुंतवणूकदारांना उत्तम परतावा दिला आहे. ज्याचा गुंतवणूकदारांना अधिक फायदा होताना दिसत आहे.
28 वर्षांत 3 कोटींपेक्षा जास्त रकमेचा फायदा
टाटा एसआयपी (Systematic Investment Plan) ही नियमितपणे गुंतवणूक करण्याची एक उत्तम पद्धत मानली जाते. टाटा ईएलएसएस टॅक्स सेव्हिंग फंडाच्या 28 वर्षांच्या आकडेवारीनुसार, गुंतवणूकदारांनी जर दरमहा 5,000 ची एसआयपी सुरू ठेवली असती तर आज त्यांना 3.34 कोटी रुपयांचा फायदा होईल. याविषयी सविस्तर उदाहरण पुढे दिले आहे.
SIP गुंतवणुकीवरील परतावा
28 वर्षांतील सरासरी वार्षिक परतावा — 17.41%
दरमहा गुंतवणूक — 5,000
एकूण गुंतवणूक — 16,80,000
28 वर्षांनंतर SIP ची एकूण किंमत – 3.34 कोटी
1 लाखाचे 1 कोटींहून अधिक रक्कम
जर कोणी टाटा ईएलएसएस टॅक्स सेव्हिंग फंडात 31 मार्च 1996 रोजी 1,00,000 ची एकरकमी गुंतवणूक केली असती तर आज त्या गुंतवणुकीचे मूल्य तब्बल 1.15 कोटी झाले असते.
एकरकमी गुंतवणुकीवरील परतावा
फंड लॉन्च तारीख — 31 मार्च 1996
सरासरी वार्षिक परतावा — 17.84%
प्रारंभिक गुंतवणूक – 1,00,000
सध्याचे मूल्य — 1,15,54,990
फंडाची सद्यस्थिती आणि AUM
मार्च 2025 पर्यंत, टाटा ईएलएसएस टॅक्स सेव्हर फंडाचे एकूण AUM (Assets Under Management) 4,108.44 कोटी इतके आहे. तसेच, रेग्युलर प्लॅनच्या खर्च गुणांक (Expense Ratio) 1.85% आहे. 19 मार्च 2025 रोजी या फंडाचा NAV (Net Asset Value) 40.26 होता.
दीर्घकालीन गुंतवणुकीचा प्रभाव
वरील आकडेवारी पाहता, टाटा ईएलएसएस टॅक्स सेव्हर फंडाने दीर्घकाळात चांगला परतावा दिला आहे. SIP किंवा एकरकमी गुंतवणूक करणाऱ्यांना 17-18% वार्षिक वाढ मिळाल्याचे दिसून येते, जे शेअर बाजाराच्या दीर्घकालीन सरासरी वाढीच्या तुलनेत स्पर्धात्मक आहे.
दरम्यान, म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही जोखमीवर आधारित असते. त्यामुळे गुंतवणूकदारांनी स्वतःच्या जोखीम क्षमता आणि गुंतवणुकीचा कालावधी विचारात घ्यावा. लक्षात घ्या की, SIP ही दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्यासाठी चांगली पद्धत आहे पण बाजारातील चढ-उताराचा परिणाम कमी करण्यासाठी संयम आणि सातत्य आवश्यक असते. महत्वाचे म्हणजे, कोणत्याही गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला अत्यावश्यक घ्यावा.