Tata EV Discount Offer : छप्पर फाड ऑफर!! Tata च्या इलेक्ट्रिक गाड्यांवर 1.70 लाखांपर्यंत सूट

Tata EV Discount Offer
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Tata EV Discount Offer । सध्या मार्केट मध्ये इलेक्ट्रिक गाड्यांची मागणी वाढत आहे. पेट्रोल- डिझेलच्या खर्चापासून सुटका करण्यासाठी अनेकजण इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करत आहेत. भारतीय बाजारात इलेक्ट्रिक स्कुटर आणि इलेक्ट्रिक कारकडे ग्राहकांचा ओढा जास्त आहे. तुम्ही सुद्धा नवी इलेक्ट्रिक कार खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी एक जबरदस्त ऑफर आम्ही आज घेऊन आलो आहोत. देशातील आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी असलेल्या TATA ने आपल्या इलेक्ट्रिक गाड्यांवर बम्पर डिस्काउंट जाहीर केला आहे. याअंतर्गत तुम्हाला तब्बल १.७० लाखांपर्यंत सूट मिळू शकते. हि ऑफर नेमकी आहे तरी काय? कोणत्या कार वर किती रुपयांचा डिस्काउंट आहे ते आपण जाणून घेऊयात…

टाटा पंच EV-

टाटा पंच EV ही कंपनीची सर्वात प्रसिद्ध इलेक्ट्रिक कार आहे. कंपनीकडून टाटा पंच ईव्हीच्या MY2024 मॉडेलवर १.२० लाखांपर्यंत सूट मिळत आहे. त्याच वेळी, कंपनी नवीन MY2025 मॉडेल खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 50,000 ची सूट देत आहे. सध्या टाटा पंच ईव्हीची एक्स-शोरूम किंमत सुरुवातीची किंमत ९.९९ लाख पासून सुरू होत असून टॉप मॉडेलची किंमत १४.४४ लाख रुपयांपर्यंत जाते.

टाटा टियागो EV- Tata EV Discount Offer

टाटा टियागो EVही देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार एक आहे. कंपनीकडून ग्राहक टाटा टियागो ईव्हीच्या MY2024 मॉडेलवर संपूर्ण १.३० लाख रुपयांची सूट मिळतेय. याशिवाय, २०२५ मध्ये बनवलेल्या MY2025 मॉडेलवर ५०,००० रुपयांचा डिस्काउंट उपलब्ध आहे. सध्या मार्केट मध्ये टाटा टियागो EV ची एक्स-शोरूम किंमत ७.९९ लाख रुपयांपासून सुरू होते.

टाटा नेक्सन EV-

टाटा नेक्सॉन ईव्ही ही भारतातील सर्वाधिक विक्री होणारी इलेक्ट्रिक SUV कार आहे.कंपनीकडून नेक्सॉन ईव्हीच्या MY2024 मॉडेलवर १.४० लाखांची सूट मिळत आहे. कंपनी नवीन MY2025 मॉडेलवर 50,000 रुपयांचा लॉयल्टी बोनस देत आहे. सध्या मार्केट मध्ये टाटा नेक्सॉन ईव्हीची किंमत १२.४९ लाखांपासून सुरू होत असून टॉप मॉडेलची किंमत १७.१९ लाखांपर्यंत आहे.

टाटा कर्व्ह EV-

टाटा कर्व्ह EVही कंपनीची नवीन आणि स्टायलिश इलेक्ट्रिक कार आहे. आकर्षक लूक मुळे ग्राहकांवर या गाडीने चांगली छाप पाडली आहे. कंपनीकडून ग्राहकांना टाटा कर्व्ह ईव्हीच्या MY2024 मॉडेलवर १.७० लाखांपर्यंत सूट देण्यात आली आहे. यामध्ये ३०,००० रुपयांचा स्क्रॅपपेज बोनस, ९०,००० रुपयांचा स्ट्रेट डिस्काउंट आणि ५०,००० रुपयांच्या लॉयल्टी बोनसचा समावेश आहे. टाटा Curve EV च्या MY2025 मॉडेलवर 50,000 रुपयांचा लॉयल्टी बोनस देखील दिला जातोय.

परंतु तुमच्या माहितीसाठी कि, वरील गाड्यांवर जी डिस्काउंट ऑफर (Tata EV Discount Offer) देण्यात आली आहे ती फक्त मे महिन्यासाठीच आहे. त्यामुळे तुम्हाला या ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर याच महिन्यात तुम्हाला या इलेक्ट्रिक कार खरेदी करावी लागेल. यासाठी तुमच्या जवळच्या डीलरशिपमध्ये जाऊन अधिक माहिती घ्या.