हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नव्या वर्षात तुम्ही जर टाटा मोटर्सची (Tata Motors) गाडी खरेदी करण्याच्या विचारात असाल तर आम्ही तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत. टाटा मोटर्सने देशभरातील ग्राहकांच्या सोयीसाठी नॅशनल एक्स्चेंज कार्निव्हल (National Exchange Carnival) कार्यक्रम सुरू केला आहे. हा कार्यक्रम 15 फेब्रुवारी 2023 पर्यंत सुरू राहणार आहे. देशभरातील 250 शहरांमध्ये या योजनेचा लाभ घेता येईल.
या माध्यमातून कारच्या एक्सचेंज वर आणि अपग्रेड वर तुम्हाला 60 हजारांपर्यंत सवलत मिळू शकते. ही ऑफर कंपनीच्या काही निवडक मॉडेल्सवर दिली जात आहे. कार्निव्हलचा शुभारंभ करताना, कंपनीचे उपाध्यक्ष, सेल्स, मार्केटिंग आणि ग्राहक सेवा, राजन अंबा म्हणाले, “टाटा मोटर्समध्ये, आम्ही आमच्या ग्राहकांच्या गरजा समजून घेण्यासाठी आणि त्यांना आनंददायी अनुभव देण्यासाठी सतत प्रयत्नशील असतो. या योजनेच्या अनुषंगाने, आम्ही ग्राहकांसाठी नॅशनल एक्स्चेंज कार्निव्हल लॉन्च करण्याची घोषणा करत आहोत.
ते पुढे म्हणाले, आम्हाला विश्वास आहे की नॅशनल एक्स्चेंज कार्निव्हल आमच्या ग्राहकांना त्यांच्या आवडत्या टाटा कारमध्ये सहजतेने अपग्रेड करण्यात मदत करेल, आणि या बदल्यात आम्हाला डिझाइन, ड्राईव्ह आणि सुरक्षितता यांचा उत्तम कॉम्बिनेशन अनुभवता येईल. दरम्यान, टाटा मोटर्स ही भारतातील प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी आहे. टाटाच्या अनेक गाड्या सध्या मार्केट मध्ये धुमाकूळ घालत आहेत. यामध्ये टियागो, टिगोर, पंच, अल्ट्रोझ, नेक्सॉन, हॅरियर, सफारी या वाहनांचा समावेश आहे.