Tata Motors ने बँक ऑफ इंडियासोबत केला वाहन फायनान्सिंग करार, आता ग्राहकांना मिळणार ‘ही’ खास सुविधा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । Tata Motors ने बँक ऑफ इंडियासोबत रिटेल फायनान्स सामंजस्य करार केला आहे. या कराराअंतर्गत कंपनीच्या सर्व प्रवासी वाहन ग्राहकांना वाहन फायनान्सिंगच्या सुविधेचा पर्याय असेल. या करारानुसार, बँक ऑफ इंडिया टाटा मोटर्सच्या ग्राहकांना 6.85 टक्के पर्यंत कमी व्याजदराने वाहन कर्ज देईल.

या सुविधेअंतर्गत वाहनाच्या मूल्याच्या जास्तीत जास्त 90 टक्क्यांपर्यंत फायनान्सिंगची सुविधा उपलब्ध असेल. यामध्ये एक्स-शोरूम किंमत तसेच इन्शुरन्स आणि रजिस्ट्रेशनचा ​​खर्च समाविष्ट असेल. यासोबतच त्यावर EMI चीसुविधाही मिळणार आहे. या अंतर्गत, 7 वर्षांच्या कालावधीत 1502 रुपये प्रति लाख या दराने हप्त्यांमध्ये कर्जाची परतफेड केली जाऊ शकते.

विविध सवलती
यापूर्वी, टाटा मोटर्सने लहान व्यावसायिक वाहने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी Equitas SFB सोबत असाच करार केला होता. ही ऑफर देशभरातील नवीन ICE कार, SUVs आणि पर्सनल सेगमेंट मधील इलेक्ट्रिक वाहनांवर लागू होईल. टाटा मोटर्सच्या कार खरेदीदारांना 31 मार्च 2022 पर्यंत या ऑफरमध्ये कोणतेही प्रोसेसिंग चार्ज भरावे लागणार नाही.

Tata EV स्पेसमध्ये झपाट्याने वाढत आहे
कंपनीने नुकतेच त्याचे निकाल सादर केले होते. त्यानुसार या तिमाहीत कंपनीला 4,415.5 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे, तर गेल्या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा तोटा 307.3 कोटी रुपये होता.

त्याच वेळी, दुसऱ्या तिमाहीत कंपनीचे उत्पन्न 61,378.8 कोटी रुपये होते, जे गेल्या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत 53,530 कोटी रुपये होते. सध्या, हा स्टॉक NSE वर रु. 13.40 (2.67%) च्या वाढीसह 515.40 च्या पातळीवर दिसत आहे.

Tata ची बाजारपेठेतील वाढती पकड
Tata Motors ने आपल्या वाहनांच्या माध्यमातून बाजारात आपली पकड मजबूत करणे सुरूच ठेवले आहे. एकेकाळी व्यावसायिक कार बनवणारी कंपनी मानली जाणारी Tata Motors आता सर्वात सुरक्षित वाहनांसाठी ओळखली जाते. फीचर्सच्या बाबतीत Tata ची वाहनेही मागे नाहीत. यामुळेच टाटा टिगोर ते नेक्सॉन आणि अगदी अलीकडच्या टाटा पंचपर्यंत कंपनीचे सर्व मॉडेल्स ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत. ET Auto च्या रिपोर्ट्स नुसार, कंपनी मार्केट लीडर मारुती सुझुकीपेक्षा एका कारवर जास्त पैसे कमवत आहे.

प्रत्येक गाडीवर एवढा नफा होतो आहे
रिपोर्ट्स नुसार, Tata Motors ने आर्थिक वर्ष 2021-22 च्या दुसऱ्या तिमाहीत प्रति कार 45,810 रुपये नफा कमावला आहे. याच कालावधीतील मारुती सुझुकीच्या तुलनेत हे जवळपास दुप्पट आहे. 10 वर्षात Tata Motors ने पहिल्यांदाच प्रति कार नफ्याच्या बाबतीत देशातील सर्वात मोठ्या कार निर्मात्याला मागे टाकले आहे. Tata Motors च्या प्रवासी वाहन विभागाचे मार्जिन FY22 च्या दुसऱ्या तिमाहीत 5.2 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. त्याच वेळी, मारुतीसाठी हे मार्जिन 4.2 टक्क्यांवर घसरले.

Leave a Comment