हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Tata Mutual Fund) जर तुम्हीही परफेक्ट गुंतवणुकीचा पर्याय शोधत असाल तर, टाटा मिडकॅप ग्रोथ फंडविषयी तुम्हाला जाणून घ्यायला हवे. गेल्या ३० वर्षांपासून ही मिडकॅप योजना सुरु आहे. जी अल्पबचत करणाऱ्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळवून देण्यासाठी ओळखली जाते. या योजनेतील SIP रिटर्न्सविषयी ऐकून तर तुम्ही अवाक व्हाल. यातील परताव्याची आकडेवारी पाहिली असता समजते की, या योजनेतील गुंतवणूकदारांना वार्षिक १७.६५% रिटर्न्स मिळाले आहेत. अर्थ तज्ञांचा सल्ला ऐकला तर दीर्घकालीन गुंतवणुक कधीही फायदेशीर ठरते. त्यात आपण SIP बद्दल बोलायचं म्हटलं तर, या माध्यमातून केलेल्या गुंतवणुकीवर कंपाउंडिंगचा फायदा मिळतो. काय मग? तुम्हीही टाटा मिडकॅपच्या SIP मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करताय का? तर चला याविषयी जाणून घेऊया
Tata मिडकॅप ग्रोथ फंड (Tata Mutual Fund)
गेल्या ३० वर्षांपासून सुरु असलेल्या टाटा मिडकॅप ग्रोथ फंडाविषयी बऱ्याच लोकांना माहिती असेल. पण सविस्तर जाणून घ्यायचे असेल तर याच्या सर्वाधिक उपलब्ध परताव्याची आकडेवारी जाणून घ्यायला हवी. याबद्दल बोलायचे झाले तर, या योजनेने २९ वर्षात SIP करणाऱ्यांना वार्षिक स्वरूपात एकूण १७.६५% रिटर्न दिल्याचे समजते. त्यानुसार, या योजनेत ज्यांनी प्रतिमहिना केवळ ५ हजार रुपयांची SIP केली आहे त्यांनी २९ वर्षांत ५,२२,२५,७६१ रुपये अर्थात ५.२२ कोटी रुपयांचा निधी तयार केला आहे.
याचे कॅल्क्युलेशन समजून घेऊया. समजा एखाद्याने मासिक स्वरूपात केवळ ५ हजार रुपयांची SIP केली आहे. ज्याचा कालावधी २९ वर्षांचा आहे. (Tata Mutual Fund) या व्यक्तीने २९ वर्षांत एकूण १८, ४०, ००० रुपयांची गुंतवणूक केली आहे. ज्यावर त्याला वार्षिक रिटर्न १७.६५% इतके मिळणार आहेत. त्यानुसार योजनेच्या मॅच्युरिटीदरम्यान म्हणजे २९ वर्षानंतर त्याच्याकडे ५,२२,२५,७६१ रुपये निधी तयार झालेला असेल. या फंडातून तुम्हाला १ वर्षात ४३.१४%, ३ वर्षांत २२.३४%, ५ वर्षांत २२.२८%, ७ वर्षांत १७.२५% आणि १० वर्षांत १८.६९% रिटर्न्स मिळू शकतात.
सुंदरम मिड कॅप फंड
सुंदरम मिडकॅप फंडाबद्दल सांगायचे तर यात सर्वाधिक उपलब्ध परताव्याची आकडेवारी आधी जाणून घेऊया. या योजनेतून २१ वर्षांच्या कालावधीचा SIP असणाऱ्यांना २१% वार्षिक परतावा दिला आहे. (Tata Mutual Fund) या योजनेत ज्यांनी प्रतिमहिना ५ हजार रुपयांची SIP केली आहे, त्यांनी २१ वर्षांत २,२५,५१,६५७ रुपये अर्थात २.२५ कोटी रुपयांचा निधी तयार केला आहे.
याचे कॅल्क्युलेशन समजून घेऊया. समजा एखाद्याने मासिक स्वरूपात केवळ ५ हजार रुपयांची SIP केली आहे. ज्याचा कालावधी २१ वर्षांचा आहे. या व्यक्तीने २१ वर्षात एकूण १३, ६०, ००० रुपयांची गुंतवणूक केली आहे. ज्यावर त्याला वार्षिक रिटर्न २१.०३% इतके मिळणार आहेत. त्यानुसार योजनेच्या मॅच्युरिटीदम्यान म्हणजे २१ वर्षांनंतर त्याच्याकडे २,२५,५१,६५७ रुपये निधी तयार झालेला असेल. (Tata Mutual Fund) या फंडातून तुम्हाला १ वर्षात ४५.३३%, ३ वर्षांत २२.८८%, ५ वर्षांत १९.२५%, ७ वर्षांत १३.५४% आणि १० वर्षांत १६.९२% रिटर्न्स मिळू शकतात.