हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील तिसरी सर्वात मोठी वाहन निर्माता कंपनी टाटाने आपली हॅचबॅक टियागोच्या किमतीत वाढ केली आहे. कंपनीने हॅचबॅकच्या काही व्हेरियंटच्या किमती वाढवल्या आहेत. टाटाने टियागोच्या किमती 5 हजारांवरून 20 हजार रुपयांपर्यंत वाढवल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांना मोठा झटका बसला आहे. कंपनीने गाड्यांच्या किमती का वाढवल्या हे सांगितलं नसलं तरी पुरवठा साखळीतील अडचणी आणि कच्च्या मालाच्या वाढत्या किमतींमुळे हा निर्णय घेण्यात आल्याची शक्यता आहे.
Tata Tiago चे सर्वात कमी किमतीचे व्हेरिएन्ट XE आहे. या गाडीची एक्स-शोरूम किंमत आता पाच लाख 44 हजार 900 रुपये आहे. यापूर्वी या कारची किंमत 5 लाख 39 हजार रुपये होती. याचा अर्थ या गाडीची किंमत पाच हजार रुपयांनी वाढली आहे.
टाटा टियागोच्या XZ+ DT, NRG XT, XZ+ DT iCNG आणि XZA+ DT मॉडेल्सच्या किमतीमध्ये 8,000 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्याच वेळी, या कारच्या इतर व्हेरियंट्स जसे की NRG AMT, Z+, XZ+ iCNG आणि XZA+ ची किंमत 7 हजार रुपयांनी वाढली आहे.
Tiago च्या XT व्हेरिएन्ट मध्ये सर्वात मोठी वाढ झाली आहे. या हॅचबॅकची नवीन किंमत 6 लाख 19 हजार 900 रुपये झाली आहे. यापूर्वी या कारची एक्स-शोरूम किंमत 5 लाख 99 हजार 900 रुपये होती. याचा अर्थ या गाडीच्या किमतीत २० हजाराची मोठी वाढ झाली आहे. एकीकडे सर्व गाड्यांच्या किमतीत कंपनीने वाढ केली असली तरी XT RHYTHM या एकाच व्हेरियंटच्या किंमतीत वाढ केलेली नाही. या कारची एक्स-शोरूम किंमत 6 लाख 49 हजार 900 रुपये आहे.