टॅक्स कलेक्शन विक्रमी पातळीवर पोहोचले, सरकारी तिजोरीत जमा झाले 27.07 लाख कोटी रुपये

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । केंद्र सरकारसाठी एक आनंदाची बातमी आहे. खरेतर, गेल्या आर्थिक वर्ष 2021-22 म्हणजेच एप्रिल 2021 ते मार्च 2022 पर्यंत टॅक्स कलेक्शन विक्रमी पातळीवर पोहोचले आहे. गेल्या आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये देशातील एकूण टॅक्स कलेक्शन विक्रमी 27.07 लाख कोटी रुपये होते. डायरेक्ट आणि इनडायरेक्ट टॅक्स कलेक्शनमध्ये वाढ झाल्यामुळे एकूण कलेक्शनमध्ये वाढ झाली आहे.

महसूल सचिव तरुण बजाज यांनी शुक्रवारी सांगितले की,” एप्रिल 2021 ते मार्च 2022 पर्यंत एकूण टॅक्स कलेक्शन 22.17 लाख कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाच्या तुलनेत 27.07 लाख कोटी रुपये होते.”

डायरेक्ट टॅक्स कलेक्शन 49 % वाढले
या कालावधीत डायरेक्ट टॅक्स कलेक्शन 49 टक्क्यांनी वाढून 14.10 लाख कोटी रुपयांवर पोहोचले, जे बजटमधील अंदाजापेक्षा 3.02 लाख कोटी रुपये जास्त आहे. पर्सनल इन्कम टॅक्स आणि कंपनी टॅक्स डायरेक्ट टॅक्स अंतर्गत येतात.

2021-22 मध्ये इनडायरेक्ट टॅक्स कलेक्शन 30% वाढले
बजाज म्हणाले की,”उत्पादन शुल्क आणि सीमा शुल्कासह इनडायरेक्ट टॅक्स कलेक्शन 2021-22 मध्ये 30 टक्क्यांनी वाढून 12.90 लाख कोटी रुपये झाले, जे बजटमधील अंदाजापेक्षा 1.88 लाख कोटी रुपये जास्त आहे. अर्थसंकल्पात डायरेक्ट टॅक्स कलेक्शन 11.02 लाख कोटी रुपये असल्याचा अंदाज होता.”

टॅक्स -जीडीपी रेशो 2020-21 मध्ये 10.3 टक्क्यांवरून गेल्या आर्थिक वर्षात 11.7 टक्क्यांवर पोहोचला. हा 1999 नंतरचा उच्चांक आहे.

Leave a Comment