Tax Exemption : आता पगारातून 1 रुपयाही कट न होता वाचवता येईल TAX; कसा? ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Tax Exemption) एप्रिल महिन्यात नवे आर्थिक वर्ष सुरु होते. प्रत्येक आर्थिक वर्षात इनकम टॅक्स संदर्भात येणाऱ्या अपडेटवर बारीक लक्ष ठेवावे लागते. विशेष करून नोकरदार वर्गाला याबाबत कायम सतर्क राहावे लागते. कारण पगार घेणाऱ्या लोकांची कायम टॅक्स वाचवताना तारेवर कसरत होत असते. दरम्यान, कंपनीदेखील टॅक्स संदर्भात गुंतवणूक आणि बचतीच्या मार्गांचा विचार करत असते. अशातच जर तुम्ही देखील गुंतवणुकीच्या दिशेने विचार करत असाल तर चालू आर्थिक वर्षात तुम्हाला ५ लाखांपेक्षा जास्त टॅक्स कसा वाचवता येईल? याबाबत आपण माहिती घेऊया.

ELSS मधील गुंतवणुकीवर १.५ लाख रुपयांपर्यंत कर सूट (Tax Exemption)

जुन्या आयकर प्रणालीनुसार आयकर कायद्याच्या कलम ८०सी अंतर्गत १.५ लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक केली असता त्यावर कोणताही टॅक्स आकारला जात नाही. यात म्युच्युअल फंडात ELSS मध्ये गुंतवणूक केल्यास चांगले पैसे वाचवता येतील. याशिवाय PPF, सुकन्या समृद्धी योजना, टॅक्स सेव्हिंग एफडी, होम लोनची मूळ रक्कम असे काही पर्याय उपलब्ध आहेत. ज्यावर कर सूटचा दावा करता येतो.

होमलोनच्या व्याजावर २ लाख रुपयांची सवलत

जर तुम्ही होमलोन घेत असाल तर प्राप्तिकराच्या कलम २४बी अंतर्गत व्याजावर २ लाख रुपयांपर्यंत कर सूट लाभ उपलब्ध आहे. (Tax Exemption) अर्थात, तुम्हाला होम लोनवर एकूण ३.५ लाख रुपयांचा टॅक्स वाचवता येऊ शकतो.

आरोग्य विम्यावर ७५ हजार रुपयांची सूट

आयकर कायद्यानुसार, स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी घेतलेल्या आरोग्य विमा प्रीमियमवर २५,००० पर्यंत कर सूट मिळते. तर वृद्धांना या विम्यावर ५०,००० रुपयेइतकी कर सूट मिळू शकते. (Tax Exemption) अशाप्रकारे, आरोग्य विम्यावर एकूण ७५ हजार रुपयांची सूट मिळते.

NPS गुंतवणुकीवर ५०,००० रुपयांची सूट

NPS अर्थात नॅशनल पेन्शन सिस्टममध्ये टियर-2 चे खाते उघडले असता ५०,००० रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर कर सूट मिळते. विशेष असे की, टियर- 2 हे खाते केवळ टियर- 1 खाते असल्यास उघडता येते.

FD व्याज

(Tax Exemption) आयकर कायद्याच्या कलम ८०सी अंतर्गत बचत एफडीमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला त्यावर मिळणाऱ्या व्याजावर ४०,००० रुपयांपर्यंत कर सुटीचा दावा करता येतो.