उंब्रज पोलिसांनी दडपून ठेवलेले प्रकरण उघसडकीस
कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
चोरीच्या घटना या नित्याच्याच झाल्या आहेत परंतु या ठिकाणी चक्क पोलीस स्टेशनमधूनच चोरी झाल्याची घटना घडली आहे तसेच या प्रकरणाला नवे वळण लागण्याची शक्यता आहे.उंब्रज पोलिसांनी सदर प्रकरण दडपण्याचा प्रकार सुद्धा झाला. या चोरीतील जप्त केलेले तब्बल पाच लाख रुपयांचे टायर उंब्रज पोलिसांच्या ताब्यातुन अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना १० महिन्यापूर्वी पोलिसांच्या लक्षात आली. यानंतर पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला होता. परंतु पोलीस ठाण्यातुन चोरीस गेलेल्या लाखो रुपये किमंतीच्या टायरमुळे उंब्रज पोलिसांच्या अब्रूचे धिंडवडे निघू नयेत म्हणून हे प्रकरण पोलिसांनी गोपनीयच ठेवले होते.शुक्रवारी या चोरीप्रकरणी उंब्रज पोलिसांनी दोघा संशयितांना अटक केल्यामुळे हे दडपून ठेवलेले चोरीचे प्रकरण उजेडात आले.
सनी आबा बैले (वय २९, रा. उंब्रज ता कराड), बरकत खुद्दबुदीन पटेल (वय ३० रा.वहागाव ता. कराड) या दोन सशयितांना पोलीस अटक केली आहे. या घटनेबाबत उंब्रज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १९ मे २०१८ रोजी फिर्यादी यांना पोलीस ठाण्यातील स्वीपर राजेंद्र कोळी यांचा फोन आला की पोलिसांच्या शासकीय निवासस्थानाच्या रूममध्ये ठेवण्यात आलेल्या जप्त मुद्देमाल मधील टायर्स नाहीत. व रूम उघडी आहे.यानंतर जोतिराम भुजबळ यांनी माहिती घेतल्यानंतर त्याना समजले की, संबधित रूममध्ये २००० सालच्या गुन्हातील जप्त करण्यात आलेले टायर ठेवण्यात आलेले आहेत.तो मुद्देमाल ६ ते ७ वर्षापासून तेथे आहे. यानंतर भुजबळ यांनी त्या रूमची पाहणी केली. तेव्हा त्यांना जप्त मुद्देमाल टायर तेथे आढळून आले नाहीत.
यानंतर भुजबळ यांनी शेजारच्या शासकीय रूम व इतरत्र संबधित टायराचा शोध घेतला व त्यानंतर उंब्रज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तत्कालीन किमतीनुसार ४ लाख ९४ हजार रुपयांचे ६१ टायर अज्ञात चोरट्यांनी शासकीय निवासस्थानातील रुमचे कुलूप तोडून चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हणले होते. यानंतर या फिर्यादीवरून संबधित पोलीस अधिकारी यांनी तपास सुरू केला होता. परंतु ही बाब आजअखेर गोपनीयच ठेवण्यात आली होती. नुकतेच उंब्रज पोलीस ठाण्याचा कार्यभार सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी घेतला आहे. उंब्रज बीटचा कार्यभार पोलीस उपनिरीक्षक ज्योत्सना भांविस्टे यांनी घेतला आहे. काही दिवसातच या आधिकार्यांनी या चोरीप्रकरणाचा छडा लावला. आधिक तपास पोलीस उपनिरीक्षक ज्योस्ना भांविस्टे करत आहेत.