हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | केंद्र सरकार हे देशातील विविध नागरिकांचा विचार करून नेहमीच अनेक योजना आणत असतात. त्याचा फायदा आजपर्यंत अनेक नागरिकांना झालेला आहे. अशातच आता भारत सरकारने टीबी रुग्णांसाठी एक मोठी दिलासा देणारी बातमी दिलेली आहे. या टीबी रुग्णांना पोषण मिळावे तसेच त्यांचा मृत्यूदर कमी व्हावा. यासाठी आता सरकारने निक्षय पोषण योजना चालू केलेली आहे. या नीक्षय पोषण योजनेच्या अंतर्गत रुग्णांना दर महिन्याला एक हजार रुपये सरकारकडून देण्यात येणार आहेत. त्यामुळे आता या रुग्णांना सरकारकडून दर महिन्याला पोषण भत्ता मिळणार आहे. यापूर्वी या टीबी रुग्णांना दरमहा 500 रुपये पोषण भत्ता मिळत होता. परंतु आता हा भत्ता 500 रुपयांनी वाढवण्यात आलेला आहे. आपला भारत टीबीमुक्त करण्यासाठी भारत सरकारने ही मोहीम चालू केलेली आहे.
टीबी रुग्णांचा पोषण भत्ता वाढवण्याचा निर्णय हा 1 नोव्हेंबर पासून लागू झालेला आहे. यावेळी डॉक्टर बी एन यादव यांनी सांगितले की, सर्व टीबी रुग्णांना पोषण भत्ता सरकारने 1 हजार रुपये केला आहे. आता ही रक्कम तीन महिन्यांसाठी तीन हजार रुपयांपर्यंत पोहोचणार आहे. पोषण भत्ता दरवर्षी सहा हजार रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे. या सर्व लाभार्थ्यांसह जुन्या ओळख झालेल्या टीबी रुग्णांना देखील याचा लाभ मिळत असला, तरी देखील नोव्हेंबरपासून त्यांचा लाभ त्यांना दिला जाणार आहे.
जिल्ह्यामध्ये टीबीचे 25,030 रुग्ण आहेत. या रुग्णांना दरमहा सरकारकडून 500 रुपये पोषणाचा भत्ता मिळत होता. ही रक्कम सरकारने पाचशे रुपयांनी वाढवून 1 हजार रुपये एवढी केलेली आहे. ही नवी रक्कम आता 1 नोव्हेंबर नंतर जिल्ह्यातील टीबी पॉझिटिव्ह असणाऱ्या रुग्णांना दिला जाणार आहे.