पदवीधर-शिक्षक मतदारसंघ निवडणूक: उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस! हे उमेदवार रिंगणात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आजचा (Teacher and Graduate Constituency Election 2020) शेवटचा दिवस आहे. त्यामुळे भाजप (BJP), महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi), मनसे (MNS), वंचित आणि बंडखोरांची लगबग सुरु झाली आहे. यावेळी त्या-त्या पक्षाचे बडे नेते उपस्थित राहणार आहेत. तर, राष्ट्रवादी, भाजपला बंडखोरीचं ग्रहण लागलं आहे

पुण्यातील लढत..
संग्राम देशमुख (भाजप) vs अरुण लाड (राष्ट्रवादी) vs प्रताप माने (राष्ट्रवादी बंडखोर) vs रुपाली पाटील ठोंबरे (मनसे) vs शरद पाटील (जनता दल) vs सोमनाथ साळुंखे (वंचित) vs श्रीमंत कोकाटे (इतिहास संशोधक)

नागपुरातून रिंगणात कोण?
अभिजित वंजारी (काँग्रेस) vs संदीप जोशी (भाजप) vs राहुल वानखेडे (वंचित) vs नितीन रोंघे (विदर्भवादी उमेदवार)

औरंगाबादमध्ये कोणाकोणात लढत?
शिरीष बोराळकर (भाजप) vs प्रवीण घुगे (भाजप बंडखोर) vs रमेश पोकळे (भाजप बंडखोर) vs नागोराव पांचाळ (वंचित) vs सतीश चव्हाण (राष्ट्रवादी) vs जयसिंगराव गायकवाड (भाजप) vs ईश्वर मुंडे (राष्ट्रवादी)

अमरावती शिक्षक पदवीधर मतदारसंघ
श्रीकांत देशपांडे (शिवसेना) vs नितीन धांडे vs दिलीप निंभोरकर (शिक्षक भारती) vs संगीता शिंदे शिक्षण संघर्ष समिती कडून (भाजपा माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांची बहीण ) vs प्रकाश काळबांडे ( विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ )

पुणे शिक्षक संघ
जयंत आसगावकर (काँग्रेस) vs उत्तम पवार (पदवीधर कल्याण मंडळ)

१ डिसेंबरला निवडणुकीसाठी मतदान
राज्यातील 5 पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकांचं बिगुल वाजले आहे. यामध्ये तीन जागा पदवीधर मतदारसंघ तर 2 जागा शिक्षक मतदारसंघाच्या आहेत. या पाच जागांसाठी पुढील महिन्यात (डिसेंबर) 1 तारखेला मतदान होईल तर 3 डिसेंबरला निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहे.

या निवडणुकीसाठी 5 नोव्हेंबरपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर आहे. 13 नोव्हेंबरला आलेल्या अर्जांची छानणी होणार आहे. तसेच अर्ज मागे घेण्याची तारीख 17 नोव्हेंबर आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in

Leave a Comment