शिक्षक ठार : साताऱ्यात माॅर्निंग वाॅकसाठी गेलेल्या दोघांना कारने उडविले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | सातारा शहरालगत मोळाचा ओढा येथे आज (शुक्रवार) सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या दोघांना अनोळखी कारने उडवले. अपघतात तामजाईनगर येथील एकाचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झालेले आहेत. सकाळी 6 वाजता घडलेल्या या अपघातानंतर घटनास्थळी लोकांनी गर्दी केली होती.

मोळाचा ओढा येथे झालेल्या या अपघातात अनिल दरेकर (रा. तामजाईनगर, सातारा) हे जागीच ठार झाले. अनिल दरेकर हे शिक्षक होत. तर आणखी एकजण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

याबाबत प्राथमिक माहिती अशी की, ही घटना आज सकाळी 6 वाजता घडली आहे. अनिल दरेकर हे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले होते. यावेळी ते चालत असताना त्यांना अनोळखी वाहनाने उडवले. यावेळी त्यांच्या पुढे असणाऱ्या दशरथ फरांदे (रा. तामजाईनगर) यांनाही धडक बसल्याने ते गंभीर जखमी झाले. पोलिस घटनास्थळी पोहोचले असून, त्यांनी माहिती घेऊन तपास सुरू केला आहे.

Leave a Comment