शिक्षक पती पत्नीच्या घरात चोरी; कराड तालुक्यात चोरट्यांचेही अनलाॅन १.० सुरु

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

मलकापूर ता. कराड गावच्या हद्दीत बंद घराचे कुलूप कशानेतरी तोडून आत प्रवेश करून घरातील सोन्या-चांदीचे दागिने व सॅमसंग कंपनीचा टीव्ही व रोख रक्कम असा एकूण 21 हजार 500 रूपयाचा मुद्देमाल चोरणार्‍या दोन चोरट्याना कराड शहर गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सुनिल चंद्रकांत धरागडे (वय 33 रा. आझाद कॉलनी, आगाशिवनगर), श्रावण राजेश कांबळे (वय 26 रा. घारेवाडी, ता. कराड) असे अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी पती-पत्नी हे दोघेही शिक्षक असून ते मलकापूर ता. कराड गावच्या हद्दीत राहत असून त्यांच्या बंद घराचे कुलूप सुनिल धरागडे व श्रावण कांबळे या दोघांनी कशानेतरी तोडून आत प्रवेश करून घरातील सोन्या-चांदीचे दागिने व सॅमसंग कंपनीचा टीव्ही व रोख रक्कम असा एकूण 21 हजार 500 रूपयाचा मुद्देमाल चोरून नेला होता. याप्रकरणी पोलीस उपअधिक्षक सुरज गुरव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या आदेशान्वये गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे यांच्या अधिपत्याखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेची वेगवेगळी पथके तयार करण्यात आली होती.

दरम्यान, पोलीस हवालदार जयसिंग राजगे व मारूती लाटणे यांच्या पथकास तपासा दरम्यान घरफोडी ही घारेवाडी व आगाशिवनगर येथील रेकॉर्डवरील गुन्हेगारांनी केली असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरीस गेलेले सोन्या-चांदीचे दागिने, टीव्ही व रोख रक्कम असा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी मिळाली असून अधिक तपास पोलीस हवालदार सुभाष फडतरे व तानाजी बागल करीत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment