शिकवणीसाठी आलेल्या 2 अल्पवयीन मुलीसोबत शिक्षकाने केले ‘हे’ दुष्कृत्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – जळगाव जिल्ह्यातील भुसावळमध्ये शिक्षकाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये एका सेवानिवृत्त शिक्षकाने आपल्या दोन अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले आहेत. या नराधम आरोपी शिक्षकाविरोधात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि धक्कादायक घटना जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरामध्ये घडली आहे.

आरोपी सेवानिवृत्त शिक्षक हा खासगी शिकवणी वर्ग घेत होता. पीडित अल्पवयीन मुली या नियमितपणे त्याच्याकडे शिकवणीसाठी येत होत्या. यादरम्यान या आरोपी नराधम शिक्षकाने दोन्ही अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले. तसेच याबाबत घरी न सांगण्याची धमकीसुद्धा या पीडित मुलींना दिली. मात्र पीडित मुली जेव्हा घरी गेल्या तेव्हा एका अल्पवयीन मुलीने आपल्या पालकांना हा सगळा प्रकार सांगितला.

पीडित मुलीने आपल्याबाबत घडलेला सर्व प्रकार घरी सांगितल्याने तिच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला. यानंतर पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी तातडीने बाजारपेठ पोलीस स्टेशनकडे धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. पोलिसांनीसुद्धा या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने पाऊल उचलले आणि नराधम शिक्षकाला अटक केली. यानंतर पोलिसांनी नराधम शिक्षकाविरोधात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Leave a Comment