मुख्याध्यापकानेच केला विद्यार्थिनीवर बलात्कार; महाबळेश्वर येथील घटनेने खळबळ

महाबळेश्वर | महिलादिनीच एका नराधम शिक्षकाने अल्पवयिन विदयार्थीनीवर बलात्कार केल्याचे प्रकरण उघडकीस आले असुन नराधम शिक्षकाच्या महाबळेश्वर पोलिसांनी मुसक्या आवळुन त्याचेवर गुन्हा दाखल केला आहे. देशभर जागतिक महिलादिन मोठया उत्साहात साजरा होत असताना महाबळेश्वर शहरामधील एका हायस्कुलच्या प्राचार्याने केलेल्या कुकर्माने हादरले आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, दिलीप रामचंद्र ढेबे वय 50 रा. मेटगुताड हा एका हायस्कुल मध्ये प्राचार्य आहे. याच हायस्कुल मधील जवळच्या नात्यातील मुलीवर शाळेच्या प्रयोग शाळेत व हॉल मध्ये वारंवार जबरदस्तीने शारिरिक संबंध प्रस्थापीत करून त्या मुलीवर अत्याचार केला. या बाबत एका जागरूक नागरीकाने चाईल्ड हेल्पलाईन 1098 या क्रमांकावर या बाबत तक्रार दाखल केली होती. महाराष्ट्र पोलिसांच्या या हेल्पलाईन वरून आलेल्या तक्रारीची गंभिर दखल घेण्यात आली. त्यांनी हे प्रकरण चौकशीसाठी महाबळेश्वर पोलिस ठाण्याकडे वर्ग केले. गेली पाच दिवसां पासुन महाबळेश्वर पोलिस या प्रकरणाचा तपास करित होते.

आरोपी व पिडीत विदयार्थीनीचा पत्ता महाबळेश्वर पोलिसांनी शोधुन काढला. पिडीत मुलीला महाबळेश्वर पोलिसांनी विश्वासात घेतल्या नंतर मुलीने आपल्यावर होत असलेल्या आत्याचाराचा पाढा वाचला. मुलीने दिलेल्या फिर्यादी वरून महाबळेश्वर पोलिसांनी नराधम प्राचार्याच्या मुसक्या आवळल्या. या बाबत प्राचार्याने पोलिसां जवळ आपल्या गुन्हयाची कबुली दिली असल्याची माहीती समजते.

महाबळेश्वर पोलिसांनी शिक्षकास अटक करून त्याचेवर भा.द.वि 354 अ , 376 क , बालकांचे लैगिंक अत्याचारा पासुन संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4,5ओ , 5 पी , 6,8,12 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाबळेश्वर पोलिस निरिक्षक बी. ए. कोंडुभैरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक ए. बिद्री या बलात्कार प्रकरणाचा तपास करीत आहेत.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप जाॅईन करा

Click Here to Join Our WhatsApp Group