Teacher Recruitment 2024 | राज्यात पुन्हा होणार 10 हजार शिक्षक भरती, जाणून घ्या TET परीक्षेची तारीख

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Teacher Recruitment 2024 | जे विद्यार्थी शिक्षक भरतीची वाट पाहत आहेत, त्यांच्यासाठी एक खूप मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. कारण नुकतीच राज्यामध्ये 11000 शिक्षकांच्या भरतीची यादी जाहीर करण्यात आली होती. त्याचप्रमाणे त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी देखील चालू आहे. आणि अशातच शिक्षण भरतीसाठी एक पुन्हा एक मोठा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे आता महाराष्ट्रातील सरकारी तसेच अनुदानित शाळांमध्ये शिक्षकांच्या रिक्त जागा मोठ्या प्रमाणात आहे. आता दरवर्षी निवृत्त होणाऱ्या शिक्षकांची संख्या वाढत चाललेली आहे.

या सगळ्याचा परिणाम असा होतो की, शाळेमध्ये शिक्षक खूप कमी असतात आणि त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे मोठे नुकसान होते. या सगळ्याचा विचार करून आता शिक्षकांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. दर 5 ते 6 वर्षातून एकदाच शिक्षक भरती (Teacher Recruitment 2024) होते. त्यामुळे शाळांची मोठ्या प्रमाणात अडचण होते. परंतु आता शिक्षण विभागाने दरवर्षी टीईटी परीक्षा घेऊन जास्त प्रमाणात शिक्षकांची भरती करण्याचा निर्णय घेतलेला आहे.

येत्या जून महिन्यामध्ये राज्यातील तब्बल 10 हजार शिक्षकांची टीईटी परीक्षा होणार आहे. शिक्षण खात्याने देखील परीक्षेची तयारी करण्याची सूचना दिलेली आहे. आणि याचे वेळापत्रक देखील लवकर जाहीर केले जाणार आहे.2014 पासून महाराष्ट्रमध्ये येईल परीक्षा घेतली जात आहे. परंतु या टीईटी परीक्षेत पास होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे शिक्षक भरतीमध्ये अडचण येत आहे. टीईटी परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांचीनंतर सिईटी परीक्षा घेण्यात येते. त्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणवत्तेनुसार शिक्षक भरती केले जाते. परंतु ही परीक्षा पास करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या केवळ 2 ते 3 टक्के अशी आहे.

विद्यार्थ्यांचे पास होण्याचे प्रमाण कमी असल्यामुळे शिक्षकांची भरती (Teacher Recruitment 2024) कमी होते. त्यामुळे शाळेत शिकवण्याची अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे आता शिक्षण विभागाने जास्त जागा भरण्याचा निर्णय घेतलेला आहे. शिक्षण खात्याने 13500 शिक्षकांच्या जागा भरतीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जून महिन्यात पुन्हा एकदा परीक्षा घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे या सर्व रिक्त जागांची आता भरती होणार आहे. सरकारच्या या निर्णयानंतर आता शिक्षक भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठ्या आनंदाची बातमी देखील आहे आणि त्यांच्यासाठी ही एक चांगली संधी चालू झालेली आहे.