मंत्रालयात सोलापुरातील दोन शिक्षकांचा आत्महत्येचा प्रयत्न

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी । राज्यात अनुदानित आणि विनाअनुदानित तसेच कायम विनाअनुदानित शांळांमधील शिक्षकांच्या अनेक समस्या वारंवार समाजासमोर येत आहेत. त्यासाठी वारंवार निदर्शने, आंदोलने केली जात असतांना मात्र सरकार या गोष्टींकडे लक्ष द्यायला तयार होत नाही आहे. अशा निराशाजनक परिसस्थित सोलापुरातील दोन शिक्षकांनी थेट मंत्रालयवरून उडी मारत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.

राज्यातील ३०० दिव्यांग शाळांना अनुदान देण्याच्या मागणीसाठी मंत्रालयात आलेल्या या दोन शिक्षकांनी आज आत्महत्येचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या दोन्ही शिक्षकांनी मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली होती. सुदैवाने दोघेही सुरक्षा जाळीत अडकल्याने मोठी दुर्घटना टाळली आहे.
हेमंत पाटील आणि अरुण नेतोरे अशी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शिक्षकांची नावे आहेत.

आपल्या मागणीकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याने दोघांनीही सरकारचा निषेध करत मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी घेतली. दरम्यान, दुसऱ्या मजल्याजवळच सुरक्षेसाठी जाळी लावण्यात आली असून त्या जाळीत दोघेही अडकले. या दोघांनाही सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. यापूर्वीही जेव्हा शासन दरबारी निराशा हाती लागल्याने अनेकांनी मंत्रालयात आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. शासन जेव्हा आपल्या समस्येची दाखल घेत नाही तेव्हा म्हणून लक्ष वेधून घेण्यासाठी अखेरचा मार्ग म्हणून आत्महत्येचा मार्ग अवलंबल्या जात असल्याची दुर्दैवी बाब या घटनेने समोर आणली आहे. तेव्हा या शिक्षकांच्या जीवन संपवण्याच्या प्रयत्नानंतर आता तरी सरकार त्यांच्या मागण्यांकडे बघणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Leave a Comment