ऑस्ट्रेलियाला धूळ चारल्यावर आता इंग्लंडची बारी; भारतीय संघ घोषित

मुंबई । टीम इंडियाचा ऑस्ट्रेलिया दौरा नुकताच संपला असून भारतीय संघाचे पुढचे लक्ष इंग्लंड आहे. कांगारुंविरुद्धची एकदिवसीय मालिका भारतीय संघाने गमावल्यानंतर टी-20 आणि कसोटी मालिका टीम इंडियाने खिशात घातल्या. यांनतर आता टीम इंडिया इंग्लंडविरोधात कसोटी, टी-20 आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या इंग्लंडच्या भारत दौऱ्याची आधीच घोषणा करण्यात आली आहे. तसेच आता भारत आणि इंग्लंडमध्ये होणाऱ्या पहिल्या दोन कसोटींसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. 5 फेब्रुवारीपासून उभय संघांमध्ये कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे.

इंग्लंड संघाच्या भारत दौऱ्याची सुरुवात कसोटी मालिकेपासून होणार आहे. टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात एकूण 4 कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहेत. या मालिकेतील पहिले 2 सामने चेन्नई तर उर्वरित 2 सामने हे अहमदाबादमध्ये खेळवण्यात येणार आहेत. पहिला कसोटी सामना 5 फेब्रुवारीला खेळवला जाणार आहे. विशेष म्हणजे या कसोटी मालिकेतील तिसरा सामना हा डे नाईट असणार आहे. दरम्यान, टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीची पॅटर्निटी लिव्ह संपली असून तो संघात पुनरागमन करणार आहे. (Team India announced sqaud against england for first 2 test Matches)

कसोटी मालिकेचे वेळापत्रक
पहिला सामना – चेन्नई – 5 ते 9 फेब्रुवारी
दुसरा सामना – चेन्नई – 13 ते 17 फेब्रुवारी
तिसरा सामना – अहमदाबाद – 24 ते 28 फेब्रुवारी
चौथा सामना – अहमदाबाद – 4 ते 8 मार्च

पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठीची टीम इंडिया : रोहित शर्मा, शुभमन गिल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, वृद्धीमान शहा, हार्दिक पांड्या, के. एल. राहुल, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, रवीचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, वाशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल

 टी-20 मालिका
पहिला सामना – 12 मार्च
दुसरा सामना – 14 मार्च
तिसरा सामना – 16 मार्च
चौथा सामना – 18 मार्च
पाचवा सामना – 20 मार्च

एकदिवसीय मालिका
पहिली मॅच – 23 मार्च
दूसरी मॅच – 26 मार्च
तिसरा मॅच – 28 मार्च

अहमदाबादमध्ये टी 20 तर पुण्यात वनडे सीरिज
कसोटी मालिकेनंतर टी 20 मालिका खेळण्यात येणार आहे. या मालिकेला 12 मार्चपासून सुरुवात होणार आहे. एकूण 5 सामन्यांची ही टी 20 मालिका असणार आहे. विशेष म्हणजे हे पाचही सामने अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियमध्ये खेळण्यात येणार आहे. मोटेरा स्टेडियम जगातील सर्वात मोठं स्टेडियम आहे. या टी 20 मालिकेनंतर सर्वात शेवटी 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. या एकदिवसीय मालिकेला 23 मार्चपासून सुरुवात होईल. हे तिनही सामने पुण्यात (Pune) खेळले जाणार आहेत.

बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like