भारतीय संघाचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनच्या गाडीला अपघात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोटा । भारतीय संघाचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांच्या गाडीला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात अजहरुद्दीन हे थोडक्यात बचावले आहेत. राजस्थानच्या लालसोट कोटा मेगा हायवेवर हा अपघात झाला आहे. सुरवाल पोलीस स्टेशनजवळ ही घटना घडली.

माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन आपल्या कुटुंबियांसह रणथंबोरला जात होते. त्यावेळी हा अपघात झाला. अझरुद्दीनसोबत आलेल्या व्यक्तीला किरकोळ दुखापत झाली असल्याचं समोर आलं आहे. अपघातानंतर मोहम्मद अझरुद्दीन हे दुसर्‍या वाहनाने हॉटेलवर पोहोचले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अझहर आणि त्यांच्या कुटुंबियांना प्राथमिक उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे ते ठीक असल्याचे समजताच त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. तर जखमी प्रवाशाला रुग्णालयात नेण्यात आलं आणि प्रथमोपचारानंतर त्याला सोडण्यात आले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment