रवी शास्त्रींना करोनाची लागण; टीम इंडियाचे चार सदस्य विलगीकरणात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | इंग्लंड विरूद्ध चौथा कसोटी सामना सुरू असतानाच भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. टीम इंडियाचे हेड कोच रवी शास्त्री यांना कोरोनाची लागण झाली असून यांच्यासह 4 सदस्य विलगीकरण कक्षात आहेत. बीसीसीआयने याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे.

रवी शास्त्री यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर बीसीसीआयच्या वैद्यकिय टीमनं गोलंदाज प्रशिक्षक भरत अरूण, क्षेत्ररक्षक प्रशिक्षक आर श्रीधर आणि फिजिओथेरपिस्ट नितीन पटेल या चौघांना विलगिकरणात राहण्याचा सल्ला दिला आहे. काल रात्री रवी शास्त्री यांची चाचणी झाली आणि त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.

दरम्यान इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटीचा आजचा चौथा दिवस असून सध्या भारतीय संघ 179 धावांनी आघाडीवर आहे. सलामीवीर रोहित शर्माच्या दमदार शतकाच्या जोरावर भारत सुस्थितीत आहे.

You might also like