टीम इंडियाचा आणखी एक खेळाडू चढणार बोहल्यावर; सोशल मीडियावर केली साखरपुड्याची घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । गेल्या काही महिन्यांपासून टीम इंडियाचे खेळाडूंच्या लग्न जुळण्याच्या बातम्या येत आहेत. अशातच टीम इंडियाचा आणखी एक खेळाडू बोहल्यावर चढणार असल्याची बातमी मिळत आहे. हा खेळू म्हणजे भारताचा लेग स्पिनर युझवेंद्र चहल. चहलने सोशल मीडियावर आपल्या साखरपुड्याची घोषणा केली आहे. ट्विटरवर युझवेंद्र चहलने त्याच्या होणाऱ्या बायकोसोबतचा फोटो शेयर केला आहे. युझवेंद्र चहल युट्युबर धनश्री वर्मासोबत लग्नगाठ बांधणार आहे.

आमच्या कुटुंबासोबतच आम्हीही एकमेकांना हो म्हणलं, असं ट्विट युझवेंद्र चहलने केलं आहे. युझवेंद्र चहलने धनश्री वर्मासोबतच्या साखरपुडयाचे फोटो ट्विट केला आहे. या फोटोमध्ये चहल आणि धनश्री कुटुंबासोबत दिसत आहे. याशिवाय दोघेही आनंदी दिसत आहेत. दरम्यान, युझवेंद्र चहल आणि धनश्री यांचं लग्नाच्या तारखेबाबत माहिती मिळालेली नाही.

युझवेंद्र चहलने आयपीएलमध्ये ८४ मॅचमध्ये १०० विकेट घेतल्या आहेत. तर भारताकडून खेळताना चहलने वनडे क्रिकेटमध्ये ५२ मॅचमध्ये ९१ विकेट आणि ४२ टी-२० मॅचमध्ये ५५ विकेट घेतल्या आहेत. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीमध्ये युएईत आयपीएल स्पर्धा रंगणार आहे. टीम इंडियाकडून खेळणारा युझवेंद्र चहल आयपीएलमध्ये बंगळुरूकडून खेळतो.कोरोना व्हायरसमुळे मार्च ते मे महिन्यात भारतात होणारी आयपीएल स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली होती. ऑस्ट्रेलियात होणारा टी-२० वर्ल्ड कप कोरोना व्हायरसमुळे रद्द झाल्याने आयपीएलचा मार्ग अखेर मोकळा झाला.

https://www.instagram.com/p/CDoC3SGn8Jd/?utm_source=ig_web_copy_link

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment