हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कदाचित माझ्या कडवड बोलण्यामुळे मी लक्षात राहत असेनं. माझ्या सहकाऱ्यांच्या हातवारीमुळे ते लक्षात राहत असतील. माझा सहकारी, माझा महाराष्ट्र सैनिक यांची ताकद आहे, त्यानेच माझी ओळख असल्याचे भावनिक उदगार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे.
राज ठाकरे यांनी एका दैनिकाला मुलाखत दिली त्यावेळी पक्ष आणि कार्यकर्त्यांविषयी बोलतना ते हळवे झाले होते. तेव्हा राज ठाकरे यांच्या डोळ्यात अश्रू तरळलेले होते. पक्ष आणि राज ठाकरे यांचा भावनिक असणारा हा व्हिडिअो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी ट्विट केला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे म्हणून राज ठाकरे आहे, माझं तोंड आणि सहकाऱ्यांचे हात आहेत यावरच तर पक्ष आहे.
– Raj Thackeray pic.twitter.com/ufqMtScq7D
— Shalini Thackeray (@ThakareShalini) June 2, 2021
महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे म्हणून राज ठाकरे आहे, माझं तोंड आणि सहकाऱ्यांचे हात आहेत यावरच तर पक्ष आहे. माझा सहकारी, माझा सैनिक हीच माझी ताकद असल्यानेच माझी ओळख असल्याचे राज ठाकरे म्हणाले आहेत.