फक्त 7400 रुपयांत लाँच झाला ‘हा’ Mobile; 50MP कॅमेरा अन् बरंच काही …

Tecno Spark 10 4G
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आर्थिक अडचणीमुळे चांगल्या क्वालिटीचे मोबाईल खरेदी करणे काही जणांना शक्य नसत. परंतु आता तुमची ही समस्या सुद्धा संपणार आहे. याचे कारण म्हणजे Tecno ब्रँडने त्यांच्या ‘Spark 10’ सिरीज अंतर्गत Tecno Spark 10 4G हा परवडणारा मोबाईल लाँच केला आहे. ४ GB RAM आणि ६४ GB स्टोरेज असलेल्या या स्मार्टफोनची किंमत अवघी 7400 रुपये असल्याने सर्वसामान्य लोकांसाठी नक्कीच हा मोबाईल परवडणारा ठरेल. आज आपण जाणून घेऊया या स्मार्टफोनची खास वैशिष्ट्ये …

6.6-इंचाचा डिस्प्ले –

Tecno Spark 10 4G मोबाइलला 720 x 1612 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.6-इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आका आहे. या डिस्प्लेला 90Hz रिफ्रेश रेट आहे. स्क्रीनच्या वरच्या बाजूला ‘U’ शेप वॉटरड्रॉप नॉच दिसेल. मोबाईलला MediaTek Helio G37 ऑक्टा-कोर प्रोसेसरसह IMG PowerVR GPU देण्यात आला आहे.

कॅमेरा

फोटोग्राफीसाठी या मोबाईलला ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. यामध्ये पाठीमागील बाजूस LED फ्लॅशसह 50-मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा मिळतो तर दुसरा कॅमेरा 2-मेगापिक्सेलचा देण्यात आला आहे. याशिवाय व्हिडिओ कॉल आणि सेल्फी साठी समोरील बाजूस 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

5,000 mAh ची बॅटरी-

Tecno Spark 10 4G ला 5,000 mAh ची दमदार बॅटरी मिळते. ही बॅटरी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. चार्जिंग आणि डेटा ट्रान्सफर करण्यासाठी या डिव्हाइसमध्ये यूएसबी टाइप सी पोर्ट देण्यात आला आहे. सुरक्षेसाठी मोबाईलला फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. तसेच कनेक्टिव्हिटीसाठी तुम्हाला ब्लूटूथ, ड्युअल सिम, जीपीएस आणि 4जी सपोर्ट मिळेल.

किंमत किती ?

Tecno Spark 10 4G या बजेट स्मार्टफोनची किंमत $90 म्हणजेच भारतीय चलनात फक्त 7,400 रुपये आहे. हा मोबाईल मेटा ब्लॅक, मेटा ब्लू आणि मेटा व्हाईट रंगांमध्ये मार्केट मध्ये दाखल झाला आहे.