Tecno Spark 20C : स्वस्तात लाँच झाला 50MP कॅमेरावाला मोबाईल; दिसतोय पण अगदी iPhone सारखा

Tecno Spark 20C launch
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Tecno Spark 20C : भारतीय बाजारात दररोज नवनवीन आणि अपडेटेड फीचर्सने सुसज्ज असलेलं मोबाईल लाँच होत आहेत. परंतु ग्राहकांची पसंती मात्र कमी पैशात चांगल्या दर्जाचा मोबाईल घेण्याकडे असते. याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध मोबाईल ब्रँड Tecno ने एक स्वस्तात मस्त मोबाईल लाँच केला आहे. Tecno Spark 20C असे या स्मार्टफोनचे नाव असून गरीब माणूस हा आरामात हा मोबाईल खरेदी करेल इतकी स्वस्त त्याची किंमत आहे. खास गोष्ट म्हणजे हा मोबाईल दिसायला अगदी हुबेहूब आयफोन सारखाच आहे. चला तर मग आज आपण या मोबाईलचे खास फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि त्याच्या किमतीबाबत सविस्तर जाणून घेऊयात….

6.6-इंचाचा डिस्प्ले-

Tecno Spark 20C मध्ये कंपनीने 90Hz रिफ्रेशीग रेटसह HD+ रिझोल्यूशन LCD डिस्प्ले दिला आहे. या डिस्प्ले मध्ये ‘डायनॅमिक पोर्ट’ नावाचे फिचर आहे, जे ॲपलच्या डायनॅमिक आयलंड वैशिष्ट्यासारखे आहे. यापूर्वी नुकत्याच लाँच झालेल्या Itel P55 Plus मध्ये देखील असाच डिस्प्ले देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन Android 13 ऑपरेटिंग सिस्टमवर वर्क करतो. कंपनीने मोबाईल मध्ये 5,000mAh बॅटरी दिली असून ही बॅटरी 18W चार्जिंगला सपोर्ट करते.

कॅमेरा – Tecno Spark 20C

मोबाईलच्या कॅमेराबद्दल सांगायचं झाल्यास, यामध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्यामागे पाठीमागील बाजूला 50 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा सेन्सर आहे. त्यासोबत आणखी एक AI सेन्सर देखील आहे, तर समोरील बाजूला सेल्फी आणि व्हिडिओ कॉल साठी 8 MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. मोबाईल मध्ये 4 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे. अन्य फीचर्सबाबत सांगायचं झाल्यास, Tecno Spark 20C मध्ये ड्युअल सिम, 4G, WIFI, ब्लूटूथ, USB टाइप-सी पोर्ट, 3.5 मिमी हेडफोन जॅक इ. यात ड्युअल स्टीरिओ स्पीकर्स आहेत आणि साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर यासारखे फीचर्स मिळतात.

किंमत किती ?

मोबाईलच्या किमतीबाबत सांगायचं झाल्यास, Tecno Spark 20C या स्मार्टफोनची किंमत कंपनीने फक्त 8,999 रुपये ठेवली आहे. जसे आम्ही याआधीच सांगितलं आहे कि, हा मोबाईल फक्त 4 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेज या एकाच व्हेरिएन्ट मध्ये येतो. येत्या 5 मार्चपासून हा स्मार्टफोन Amazon वर विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येणार असून तुम्ही तो पांढरा, हिरवा, सोनेरी आणि काळ्या रंगात खरेदी करू शकता.