लातूरमध्ये दीड लाखांची लाच घेताना तहसिलदाराला अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लातूर : हॅलो महाराष्ट्र – लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात वाळूचा धंदा सुरू ठेवण्यासाठी चक्क तहसिलदाराने महिना 30 हजार रुपयांच्या लाचेची (Bribe) मागणी केली आहे. तब्बल दीड लाखांची लाच (Bribe) घेताना तहसीलदाराच्या एजंटला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. निलंगा तालुक्यात वाळूचा धंदा सुरू ठेवण्यासाठी तहसीलदाराने लाच (Bribe) मागितल्याचा प्रकार समोर आल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी तहसिलदार गणेश जाधव आणि एजंट रमेश मोगेरगे यांना अटक करण्यात आली आहे.

तहसीलदार गणेश जाधव याने आपल्या एजंटच्या मदतीने तक्रारदार दाराकडून वाळूच्या तीन ट्रक नियमितपणे चालवू देण्यासाठी आणि वाळूच्या ट्रकवर या पुढे कारवाई न करण्यासाठी पैसे मागितले होते. यासाठी प्रती ट्रक 30,000/- रूपये प्रमाणे दोन ट्रकचे 60,000/- रूपये प्रति महिने असा व्यवहार ठरला होता. तीन महिन्याचे 1,80,000/- रूपये झाले होते.प्रत्यक्ष लाच मागणी करून तडजोडी अंती 1,50,000 रुपयांवर ठरलं होतं.

त्यानंतर ठरल्याप्रमाणे एजंट रमेश मोगेरगे याच्याकडे पैसे देण्याचे सांगितले होते. त्या प्रमाणे तक्रादाराने रमेश मोगेरगे याना निलंगा येथे तहसीलदाराच्या घरासमोर बोलावले. तिथे 1,50,000/- रूपयांची रक्कम देत असताना अँटी करप्शन ब्युरोने त्यांना रंगेहाथ (Bribe) पकडले. त्यानंतर तहसीलदार गणेश जाधवला तसेच त्याच्या एजंटला अटक करण्यात आली. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

हे पण वाचा :
आता DCB Bank कडून कर्ज घेणे महागणार, बँकेने MCLR मध्ये केली 0.23 टक्क्यांनी वाढ

नाशिकमध्ये चुकून एक्सलेटर वाढवला अन् तरुणी स्कूटीसह थेट ATM Center मध्ये घुसली

आपल्या आधार कार्डशी किती सिम कार्ड लिंक्ड आहेत ???

IPL मध्ये संधी न मिळालेल्या Arjun Tendulkar ला कपिल देवनं दिला ‘हा’ मोलाचा सल्ला

आता 30 जूनपर्यंत पॅन-आधार लिंक केले नाही तर द्यावा लागणार दुप्पट दंड !!!

Leave a Comment