लस घ्या तरच बाजारात या ! लसीकरणासाठी तहसीलदार, तालुका आरोग्य अधिकारी रस्त्यावर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बीड: कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण हाच एकमेव पर्याय असल्याने व तालुक्यातील लसिकरण चे उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आरोग्य विभागाकडून लसीकरण वारी सुरू करून आठवडी बाजारात लस देण्याचे काम सुरू केले आहे.लसीकरण मोहिमेत शिवाजी महाराज चौक, चाटे चौकात फिरती लसिकरण मोहीम राबवण्यात आली .यावेळेस तहसीलदार प्रकाश सिरसेवाड, गटविकास अधिकारी मीनाक्षी कांबळे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.ज्ञानेश्वर निपटे यांनी बुधवार रोजी पुर्ण बाजार पेठेत नागरिकांना आडवून लस घ्या तरच बाजारात या असे आव्हान करत फेरी काढली.

सकाळी 11 वाजेपर्यंत जवळपास 400 नागरिकांचे कोवीड लसीकरण पुर्ण झाले होते तर लसीकरण साठी नागरिकांतून प्रतिसाद मिळत होता.बाजारात येणा-या सर्वच लोकांची कसून चौकशी करून लसीकरण साठी प्रयत्न सुरू आहेत.लसीकरणाचा टक्का वाढवा, असा तगादा रोजच लावला जात आहे. असे असले तरी टक्का वाढत नसल्याने आता प्रशासनाने काही नियम कठोर केले आहेत.

लस घेतली तरच शासकीय कार्यालयांत प्रवेश, प्रमाणपत्र मिळणार नाही, अशा अनेक अटी टाकल्या आहेत. तसेच शहराच्या प्रवेशद्वारावर दोन रुग्णवाहिका थांबवून पोलिसांच्या मदतीने लाेकांना अडविले जात आहे. त्यांना लस घेण्याबाबत आवाहन केले जात आहे. प्रतिसादही मिळत असल्याचे दिसत आहे.

कोरोना प्रतिबंधक लस घेणे सक्तीची नसल्याचे अनेकांकडून प्रशासनाला सांगितले जात आहे. यावर अधिकारी त्यांची समजूत काढतात. ही लस घेतली तर कोरोना संसर्ग होण्याची भीती कमी आहे. तसेच आपण व आपले कुटुंब सुरक्षित राहाल, अशी जनजागृती केली जात आहे.

आठवडी बाजारात फिरून लस घेण्याचे आवाहन

बुधवार रोजी आठवडी बाजार असतो ग्रामीण भागातील लोक मोठ्या प्रमाणावर येत असल्याने मुख्य मार्गा तहसीलदार व तालुका आरोग्य विभागाने तीन ठिकाणी लसीकरण बुथ तैनात करून वैद्यकीय अधिकारी, तलाठी , मंडळ अधिकारी ,पोलिस व आरोग्य कर्मचार्‍यांमार्फत लस घेण्यासाठी विनवणी करत होते.या विनवनीला प्रतिसाद मिळत होता.

Leave a Comment