तर तेजस ठाकरे होणार ‘युवासेना प्रमुख’ ?

0
56
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

विशेष प्रतिनिधी। युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे हे पहिल्यांदाच निवडणूक लढवणार असतानाच आता त्यांचे धाकटे बंधू तेजस ठाकरे यांच्या नावाची ही जोरदार चर्चा सुरु आहे. या चर्चेचे कारण म्हणजे तेजस ठाकरे यांचा राजकीय व्यासपिठांवर वाढलेला वावर. बुधवारी तेजस हे संगमनेरमधील शिवसेनेच्या सभेमध्ये व्यासपीठावर दिसून आले. यानंतर तेजस यांच्या राजकारणातील प्रवेशाच्या चर्चांना उधाण आले आहे.

राजकीय वर्तुळात रंगत असलेल्या चर्चांनुसार युवासेना प्रमुख पदाची माळ तेजस यांच्या गळ्यात पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. असे झाल्यास ठाकरे कुटुंबाच्या चौथ्या पिढीतील दुसरा शिलेदार राजकीय आखाड्यामध्ये दिसेल. दरम्यान राजकीय वर्तुळातील चर्चांनुसार तेजस यांचे थोरले बंधू आदित्य ठाकरे हे वरळीमधून विधानसभा निवडणूक लढवत असून त्यांचा विजय जवळजवळ पक्का समजला जात आहे.

जर आदित्य आमदार झाल्यानंतर युवासेना प्रमुखपदी २४ वर्षीय तेजस यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. मागील काही काळापासून तेजस यांचा राजकीय मंचावरील वावर वाढल्याचे दिसत आहे. विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर तेजस यांच्या राजकारणातील प्रवेशाची ही पूर्वतयारी असल्याची चर्चा आहे. मागील वर्षी आदित्य ठाकरेंनी मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत मिळवलेल्या यशानंतर सामानमध्ये छापण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये तेजस ठाकरेंचा फोटो छापण्यात आल्यानंतर पहिल्यांदा तेजस यांच्या राजकरणातील प्रवेशाची चर्चा सुरु झाली होती.

 इतर काही बातम्या-

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here