ट्रक आणि ट्रॉलीचा भीषण अपघात, 8 जण जागीच ठार

हैदराबाद : वृत्तसंस्था – तेलंगणातील कामारेड्डी जिल्ह्यात एक भीषण अपघात (accident) घडला आहे. यामध्ये ट्रक आणि ट्रॉलीची समोरासमोर धडक होऊन एक भीषण अपघात (accident) घडला आहे. या अपघातामध्ये 8 जण ठार झाले तर 17 जण जखमी झाले आहेत. एल्लारेड्डी मंडलच्या हसनपल्ली गेटजवळ सुमारे 26 प्रवासी घेऊन जाणाऱ्या ऑटो ट्रॉलीला वेगवान ट्रकने जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला.

या भीषण अपघातात तिघा जणांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जणांचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला आहे. तसेच या अपघातात 17 जण जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. हे सर्व जण पितलाम मंडलातील चिल्लर्गी गावचे रहिवासी आहेत.

एल्लारेड्डीहून आपल्या गावी परतत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने त्याला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला आहे. लच्छव्वा, देववैया, कमसव्वा, केशैया आणि ऑटो ट्रॉली चालक साययुलू अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. या अपघाता (accident) प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

हे पण वाचा

PM Kisan : शेतकऱ्यांना 11वा हप्ता मिळण्यास होतो आहे उशीर

फक्त 82 रुपयांमध्ये Vi युझर्सना पाहता येणार अनलिमिटेड वेबसीरीज-मुव्हीज

E-Commerce : खुशखबर !!! ‘या’ सरकारी वेबसाइटवर स्वस्त दरात खरेदीची संधी

कट मारून जाणे बेतले जीवावर, ट्रकखाली चिरडून बाइकस्वाराचा मृत्यू

फ्री मध्ये Netflix वापरण्यासाठी Airtel चे ‘हे’ खास प्लॅन