Telegram Ban in India | टेलिग्राम भारतात होणार बंद ? जाणून घ्या कारण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Telegram Ban in India | सध्या सोशल मीडिया हे एक तरुणाईचे खूप मोठे व्यसन बनलेले आहे. सोशल मीडिया शिवाय लोक राहतच नाही. अगदी मिनिटा मिनिटाला त्यांना सोशल मीडियावर अपडेट्स चेक करायचे असतात. सध्या अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. त्यातील टेलिग्राम हा एक भारतातील सर्वात मोठा वापरला जाणारा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. Telegram वर आपल्याला अनेक सुविधा मिळतात. अनेक लोक हे स्टडी मटेरियल देखील टेडीग्रामवर शेअर करतात. त्याचप्रमाणे अनेक वेबसिरीज तसेच मुव्हीज देखील आपल्याला टेलिग्रामवर पाहता येतात तसेच टेलिग्रामच्या माध्यमातून तुम्हाला ऑनलाईन क्लासेसचे सबस्क्रीप्शन देखील घेता येते. थोडक्यात प्रत्येक गोष्ट आपल्याला टेलिग्रामच्या मार्फत मिळते.

जे लोक ग्रामीण भागात राहतात त्यांना शहरात येऊन मोठमोठे क्लास लावायला जमत नाही. अशा सगळ्यांसाठी टेलिग्राम (Telegram Ban in India) हे एक महत्त्वाचे साधन आहे. परंतु आता टेलिग्रामच्या माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक वाईट बातमी आलेली आहे. ती म्हणजे टेलिग्राम हे प्लॅटफॉर्म भारतात बंद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परंतु नेमके यामध्ये कारण काय आहे? याची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

टेलिग्राम या सोशल मीडिया ॲपवर आतापर्यंत अनेक आरोप झालेले आहे. तरी देखील हे ॲप अजून उपलब्ध आहे. काही दिवसांपूर्वी टेलिग्रामवर पेपर लीक झाल्याचा प्रकार घडलेला आहे. तसेच टेलिग्रामवर वसुली आणि सट्टेबाजी यांसारख्या गोष्टी करण्याला प्रोत्साहन दिले जाते. असे देखील आरोप करण्यात आलेले होते. हाती आलेल्या माहितीनुसार सरकारकडून टेलिग्राम (Telegram Ban in India) अँपची चौकशी सुरू झालेली आहे आणि या आरोपामध्ये काही तथ्य देखील समोर आलेले आहे. त्यामुळे आता टेलिग्रामच्या वापरावर बंदी देखील केली जाऊ शकते. सरकारकडून टेलिग्रामची चौकशी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे टेलिग्राम ॲप बंद होते की? काय असे सगळ्यांमध्ये भीती निर्माण झालेली आहे.

काही दिवसापूर्वी मेडिकल प्रवेश परीक्षेचा पेपर लीक झाला होता आणि या प्रकरणात टेलिग्रामचा सहभाग असावा. असे निदर्शनास आल्यानंतर सरकारने या ॲपचाची चौकशी सुरू केली आहे. Telegram वर असा आरोप केला जात आहे की, telegram च्या माध्यमातून मेडिकल पेपर 5 हजार ते 19 हजार रुपयांच्या किमतीला विकला गेला होता. तसेच टेलिग्रामवर खोट्या बातम्या पसरवल्याचा देखील आरोप होता. काही दिवसांपूर्वी टेलीग्रामचे सीईओ पावेल ड्युरोव यांना फ्रान्समध्ये अटक करण्यात आले होते. फ्रान्समधील OFMIN या संस्थेने टेलीग्रामवर फसवणूक, अंमली पदार्थांची तस्करी, सायबरबुलींग आणि बालगुन्हेगारीमध्ये गुंतल्याचा आरोप केला होता.