हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Telegram Earning) आत्ताचं डिजिटल युग इतक्या वेगाने प्रगती करत आहे की काय बोलायचं काम नाही. आजकाल जो तो सोशल मीडियावर सक्रिय आहे. सोशल मीडियाचे विविध प्लॅटफॉर्म आहेत. ज्यांचा वापर अनेक युजर्स करतात. काही मनोरंजनासाठी तर काही मनोरंजन करण्यासाठी. यातून अनेक लोक लाखो रुपयांचं उत्पन्न मिळवत आहेत. फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, युट्युब हे काही लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत. मात्र टेलिग्रामसुद्धा कमी लोकप्रिय नाही.
गेल्या काही काळात इंस्टाग्राम आणि युट्युबचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. मुख्य म्हणजे, या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून युजर्सला प्रसिद्ध आणि पैसे कमावण्याची संधी प्राप्त झाली आहे. (Telegram Earning) त्यामुळे सध्या अनेक रील स्टार रोज नव्याने प्रसिद्ध होताना दिसत आहेत. दरम्यान, केवळ इंस्टाग्राम किंवा युट्युब नव्हे तर टेलिग्राम सुद्धा एक असा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे, जो ना केवळ मनोरंजन करतो तर प्रसिद्धी आणि पैसा कमावण्यासाठी सुद्धा मदत करतो.
अनेक लोकांना टेलिग्राम माहित आहे. पण त्याचा वापर पैसा कमावण्यासाठी कसा करतात? याविषयी अजूनही अनेक युजर्स अनभिज्ञ आहेत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला टेलिग्राम चॅनेलच्या माध्यमातून पैसे कसे कमवायचे? याविषयी महत्त्वाची माहिती देणार आहोत. ज्याविषयी जाणून घेतल्यानंतर तुम्हीही टेलिग्रामच्या माध्यमातून लाखो रुपयांची कमाई अगदी आरामात करू शकाल.
टेलिग्राम Advt प्लॅटफॉर्म (Telegram Earning)
एका वृत्तानुसार टेलीग्राम कंपनीचे फाउंडर सीईओ पावेल डूरोव्ह यांनी ऍड प्लॅटफॉर्मविषयी माहिती प्रदान केली आहे. त्यांनी सांगितलं की, ‘कंपनीच्या माध्यमातून लवकरच एक ऍड प्लॅटफॉर्म लॉन्च करण्यात येणार आहे. जो साधारणपणे येत्या महिन्यात लॉन्च केला जाईल. या ऍड प्लॅटफॉर्मच्या लॉन्चिंगनंतर टेलिग्राम चॅनेल ओनर्स हे स्वतःचा कंटेंट टेलिग्राम चैनल वर मॉनिटाइज करू शकतील. यामुळे युजर्सना आपल्या चॅनेलमध्ये जाहिराती दाखवून त्या माध्यमातून पैसे कमावण्याची संधी मिळेल.
५० टक्के नफा
मुख्य म्हणजे टेलिग्राम चॅनेल ओनर्स आपल्या चॅनेलवर ऍड दाखवून त्यातून जवळपास ५० टक्के नफा मिळवू शकतात. (Telegram Earning) त्यामुळे टेलिग्रामच्या माध्यमातून मिळणारी ही संधी टेलिग्राम चॅनेल ओनर्ससाठी सुवर्ण संधी आहे, असे म्हणायला हरकत नाही. दरम्यान, जे कोणी टेलिग्राम चॅनेलचे ओनर्स असतील त्यांना त्यांच्या मॉनिटाइज झालेल्या कंन्टेन्टसाठी रिवार्डसुद्धा मिळेल. हा रिवॉर्ड टोन कॉइनच्या स्वरूपात असेल. टोन कॉइन हे ब्लॉक चेनवर असणारे एक क्रिप्टोकरन्सीचे नाव आहे.
जगभरातील युजर्स घेऊ शकणार लाभ
जर तुम्ही टेलिग्राम युजर असाल, तुमचे टेलिग्रामवर स्वतःचे चॅनेल असेल पण तुम्ही परदेशात राहत असाल तरीही तुम्ही या स्कीमचा पुरेपूर फायदा घेऊ शकणार आहात. (Telegram Earning) कारण, टेलीग्रामवर असणाऱ्या चॅनेलची संख्या लक्षात घेता सर्व चॅनल्सवर महिन्याला मिळून तब्बल १ ट्रिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज जनरेट होत असल्याचे दिसून आले आहे. मात्र यामध्ये केवळ १० टक्के मॉनिटाईज करण्यात आले आहेत. हे टेलिग्राम एड्स प्रमोशन टूलच्या मदतीने केले गेले आहे.
येत्या मार्चमध्ये एकदा टेलिग्राम ऍड प्लॅटफॉर्म लॉन्च झाला की, जवळपास १०० देशातील चॅनेल मालक टेलिग्रामच्या माध्यमातून पैसे कमाऊ शकणार आहेत. रेव्हेन्यूबाबत बोलायचे झाले तर, याचा क्रायटेरिया काय असेल आणि त्याच्या मॉनिटायझेशनचे नियम काय असतील? याची माहिती लवकरच कंपनीद्वारे दिली जाईल. (Telegram Earning)