Thursday, October 6, 2022

Buy now

काय सांगता ! शहरात तब्बल 1601 धार्मिक स्थळे

औरंगाबाद – शहर पोलिसांच्या हद्दीमध्ये असलेल्या धार्मिक स्थळांची माहिती जमा करण्यात येत आहे. जमा केलेल्या माहितीनुसार सर्व धर्मीयांची 1601 प्रार्थनास्थळे आहेत. अशी माहिती पोलिस प्रशासनातील सूत्रांनी दिली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनांनी मशिदीवरील भोंगे यांचा प्रश्न उपस्थित केला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याच्या पोलिस महासंचालकांनी आगामी काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व धर्मातील प्रार्थना स्थळांची माहिती जमा करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार शहर पोलिसांनी त्यांच्या हद्दीतील प्रार्थना स्थळांची माहिती प्रत्येक पोलीस ठाणेनिहाय जमा करण्यास सुरुवात केली होती.

त्यानुसार शहर पोलिसांच्या हद्दीत मंदिरांची संख्या ही सर्वाधिक 1 हजार 20 एवढी आहे. त्याशिवाय मशिदींची संख्या 417, चर्च 40, बौद्धविहार 120 आणि गुरुद्वाराची संख्या 4 एवढी आहे. अशी शहरात एकूण 1601 धार्मिक स्थळे असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या धार्मिक स्थळांचा व्यवस्थापकांचे नंबर, लोकेशन आणि इतर माहितीही शहर पोलीस जमा करत आहेत. सर्व माहिती एकत्रित केल्यानंतर राज्याच्या पोलिस महासंचालकांकडे पाठविण्यात येणार आहे.