पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देहूत; संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिरांचे करणार लोकार्पण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आषाढी वारीसाठी सोमवारी (२० जून) जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. त्यापूर्वीच संत तुकाराम महाराज शिळा मंदिराच्या लोकार्पणाचा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते आज देहू येथील संत तुकाराम महाराज शिळा मंदिरांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. लोकार्पणानंतर ते मुंबईत राज्यपालांच्या निवास्थानाच्या इमारतीचे उद्घाटन कार्यक्रम आहे.

लोकार्पण कार्यक्रमासाठी देहू येथील मंदिर परिसरात सभामंडप उभारण्यात आला आहे. पंतप्रधान मोदी यांचे संत तुकाराम पगडीने स्वागत करण्यात येणार आहे. दुपारी 1 वाजून 10 मिनिटांनी मोदी यांचे लोहगाव विमानतळावर आगमन होणार आहे. त्यानंतर ते विमानतळा वरून देहूच्या दिशेने रवाना होतील. दुपारी 1 वाजून 45 मिनिटांनी ते मंदिर समिती जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज मंदिर संस्था परिसरात दाखल होणार आहेत. या ठिकाणी संत तुकाराम महाराज मूर्ती शिळा मंदिराचा लोकार्पण कार्यक्रम होणार आहे.

दुपारी 2 वाजून 10 मिनिटांनी पंतप्रधान मोदी हे सभेच्या ठिकाणी दाखल होणार आहेत. त्यानंतर त्यांची 50 मिनिटांची सभा होणार असून, मोदी वारकरी आणि भाविकांशी संवाद साधणार आहेत.

पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री ठाकरे एका व्यासपीठावर उपस्थित राहणार

पंतप्रधान मोदी हे देहू येथील कार्यक्रम पार पडल्यावर मुंबईत दाखल होणार आहेत. दुपारी त्यांच्या हस्ते राजभवनमध्ये ‘जल भूषण’ या नव्याने उभारण्यात आलेल्या राज्यपालांच्या निवासस्थानाची इमारत आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या क्रांती गाथा या दालनाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेही या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.

Leave a Comment