शाळेत तात्पुरते कारागृह बनवण्याची चाचपणी; ‘या’ जिल्ह्यात प्रशासनाकडून प्रयत्न सुरु

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

 

औरंगाबाद । कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नव्याने आलेल्या कैद्यांमुळे जेल मधील इतर कैदी अथवा कर्मचारी यांना कोरोनाची लागन होऊ नये म्हणून तात्पुरते कारागृह उभारणीसाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण व अप्पर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे यांनी SBOA शाळेस भेट दिली.
यावेळी तेथील मुख्याध्यापक व शिक्षक कर्मचाऱ्यांशी संवाद साधून जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी तेथील परिस्थितीचा आढावा घेतला.

मागील वेळी देखील तात्पुरते कारागृह उभारल्यानंतर नूतनीकरणासाठी आलेला खर्च जिल्हाधिकारी यांनी त्यांना देण्याचे आदेश दिले.सदरील परिसरात cctv बसविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.तसेच शाळेचे कुठल्याही प्रकारे नुकसान होणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश त्यांनी संबंधितांना दिले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती माने यांनी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचे आभार मानले.

हर्सूल कारागृहामध्ये सध्या १४०० च्या जवळपास कैदी तर २१५ कर्मचारी आहेत. SBOA शाळेतील ४ रूम ह्या पुरुष कैद्यांसाठी तर १ रूम ही महिला कैद्यांसाठी देण्यात येणार आहे.यावेळी उपविभागीय अधिकारी रोडगे, आर. आर भोसले (प्र. अधिक्षक), गिरी (पोलीस निरीक्षक), नायब तहसीलदार सलोक व संबंधित अधिकरी उपस्थित होते.